Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर रायगड लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घ्या - अजित पवार

लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी घ्या – अजित पवार

पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सभा, संमेलने, मोर्चांचे आयोजन करु नका, कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊ नका आणि जर घ्यायचेच झाले तर साधेपणाने करा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका कार्यक्रमासाठी रायगडदौऱ्यावर आहेत. याठीकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना दिल्या आहेत. पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने रायगडमधील प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे. लोकसंख्या वाढते आहे. नागरिकरण वाढतंय यामुळे पिण्याच्या पाण्याचा साठा वाढवणे गरजेचे आहे. प्रतिकुल परिस्थीतीवर मात करुन पुढे जायचे आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षभरापासून कोरोना संकट राज्यावर घोंघावत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. उत्पादन झाले नसल्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाल्याने गती मंदावली आहे. केंद्राच्या जीएसटीची रक्कम येणे अजूनही बाकी आहे. लोकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत लोकांना असे वाटते की आपले सरकार आहे आपल्या आपेक्षा पुर्ण करतील त्यामुळे अशा वेळेस मी आणि मुख्यमंत्री नेहमी विकासाच्या बाबतीत चर्चा करत असतो.


- Advertisement -

हेही वाचा : भीमा-कोरेगाव हिंसा प्रकरण: वरवरा राव यांना अंतरिम जामीन मंजूर


न्हावा-शेवा महामार्गाचे काम जोरात सुरु आहे. कोस्टल प्रकल्पाचा कामाला गती आली आहे. तसेच राज्यात मेट्रो कामेही जोरात सुरु आहेत. पुणे-मुंबई बोगद्याचे काम सुरु आहे. गोवा-मुंबई महामार्ग चांगला झाला पाहिजे असे कोकणवासियांचे स्वप्न होते त्याला आता गती मिळाली आहे. त्याचीही पाहणी केली आहे. राजकारण न आणता कोकणचा आणि महाराष्ट्राचा कायापालट व्हावा असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आभाळातून पडलेला प्रत्येक थेंब कसा साठवला जाईल आणि जमिनीत मुरवला जाईल याचा विचार केला पाहिजे म्हणून घरोघरी आणि सोयाट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगची योजना आणली असे अजित पवार यांनी म्हटले आहे. पाणी हेच आपले जीवन आहे असे आपण ऐकत आलो आहोत परंतु आता ते आंमलात आणण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत असे उमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -