Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर रायगड जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के

जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल शंभर टक्के

37 हजार विद्यार्थी होणार उत्तीर्ण

Related Story

- Advertisement -

कोरोनामुळे दहावीच्या थेट परीक्षा न घेता अंतर्गत मुल्यांकनाद्वारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 37 हजार 295 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असून, स्वाभाविक सर्व शाळांचा निकाल यंदा शंभर टक्के लागला आहे.

कोरोनाच्या महामारीला रोखण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सरकारने शाळा, महाविद्यालये बंद ठेवली होती. कालांतराने कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने सरकारने ती पुन्हा सुरू केली. त्यानंतर दुसर्यांदा कोरोनाचा विळखा घट्ट झाल्याने सरकारने थेट दहावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेताना कोणते निकष लावणार, असे प्रश्न उभे राहणार आहेत.

- Advertisement -

दहावीच्या विद्यार्थांना उत्तीर्ण करताना इयत्ता 9 वीमधील 50 गुण गृहित धरण्यात येणार आहेत. तसेच 30 गुण गृहपाठासाठी आणि 20 गुण तोंडी परीक्षा, प्रात्याक्षिक यांच्यासाठी असणार आहेत. काही मुले 9 वीमध्ये कमी अभ्यास करतात. दहावीमध्ये गेल्यानंतर मुले चांगला अभ्यास करतात. कारण बोर्डाची परीक्षा असेत. त्यामुळे 9 वीचे 50 टक्के गुण गृहित धरणे कितपत योग्य ठरेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

असे असेल नवे सूत्र..

- Advertisement -

विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करताना अंतर्गत मुल्यांकनावर आधारित गुण देण्यात येणार आहेत. यासाठी इयत्ता 9 वीमधील 50 गुण गृहित धरण्यात येणार आहेत. तसेच 30 गुण गृहपाठासाठी आणि 20 गुण तोंडी परीक्षा, प्रात्याक्षिक यांच्यासाठी असणार आहेत.

- Advertisement -