Maharashtra Assembly Election 2024
घररायगडMaharashtra Election 2024 : दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात, मात्र मतदानाच्या दिवशीच भानामतीचा...

Maharashtra Election 2024 : दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात, मात्र मतदानाच्या दिवशीच भानामतीचा प्रकार

Subscribe

राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पाडलं, मात्र काही ठिकाणी गोंधळ आणि राडा झालेला पाहायला मिळत आहे. अशातच रायगड जिल्ह्यातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावरील एका रस्त्यावर भानामतीचा प्रकार समोर आला आहे.

महाड : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी आज संपूर्ण 288 मतदारसंघात मतदान संपलं आहे.  राज्यात अनेक ठिकाणी शांततेत मतदान पार पाडलं, मात्र काही ठिकाणी गोंधळ आणि राडा झालेला पाहायला मिळत आहे. अशातच रायगड जिल्ह्यातून एका धक्कादायक बातमी समोर येत आहे. महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावरील एका रस्त्यावर भानामतीचा प्रकार समोर आला आहे. (Amidst the backdrop of the assembly elections a case of Bhanamati in Birwadi town near Mahad)

महाडमध्ये यंदा शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रतोद आणि एस्टी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले आणि ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप हे दोघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे या मतदारसंघातून भरत गोगावले हे सलग तीन वेळा यांनी विजय झाले आहेत. यावेळी त्यांना चौथ्यांदा निवडणूक संधी आहे. अशातच या मतदारसंघातून भानामतीचा प्रकार समोर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Election 2024 : दोन्ही शिवसेनेचे उमेदवार रिंगणात, मात्र मतदानाच्या दिवशीच भानामतीचा प्रकार

महाडजवळील बिरवाडी शहराच्या नाक्यावरील एका रस्त्यावर मधोमध तीन मडकी आणि नारळ दगडाच्या मदतीने रचून ठेवण्यात आले होते. यातील तीन पैकी दोन मडक्यांची तोंड लाल आणि काळ्या फडक्याने बंद करून खाली नारळ असे ठेवण्यात आले होते. रस्त्याच्या मधोमध हा भानामतीचा प्रकार करण्यात आला होता. यामुळे ग्रामस्थांमध्ये काही प्रमाणात भीती वातावरण निर्माण झाले होते. मात्र आज मतदानाच्या दिवशी असा प्रकार झाल्याने काही लोकांनी संतापही व्यक्त केला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर कोणी देवदेवस्की केली का? अशी चर्चाही रंगली आहे. मात्र पोलिसांनी याबाबत माहिती समजताच त्यांनी हा सगळा प्रकार उधळून लावला आहे. त्यांनी तिन्ही मडकी रस्त्याच्या बाजूला फेकून दिली आहेत.

- Advertisement -

स्नेहल जगताप गोगावलेंना शह देणार?

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर भरत गोगावले यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली आहे. महाड मतदारसंघात गोगावले यांचे पारडं जड असल्याने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेतील फुटीनंतर स्नेहल जगताप यांनी काँगेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. त्यामुळे गोगावले यांच्या विरोधात त्यांना ठाकरे गटाकडून संधी देण्यात आली. त्यामुळे आता शिवसेनेतील होणाऱ्या पहिल्या विधानसभा निवडणुकीत महाड मतदारसंघातील नागिरिक कोणाला विजयी करतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा – Sharmila Thackeray : आम्ही आरशासमोर निवडणूक लढवत नाही; शर्मिला यांची आदित्य यांच्यावर टीका


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -