घररायगडफणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाण स्थळे

फणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाण स्थळे

Subscribe

फणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाण स्थळे आहेत . यातील चिखलगाण पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात . त्यांचे जवळुन निरीक्षण करता यावे म्हणून एक खास घर बांधण्यात आले आहे . तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा , गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणा साठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत. . आज बौद्ध पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश हा प्रखर असल्याने महाराष्ट्रातील सर्व अभयारण्यात आज वन्यजीवांची गणना केली जाते.

मुरुड: फणसाड अभयारण्यात तब्बल २७ पाण स्थळे आहेत . यातील चिखलगाण पाणस्थळावर अनेक पक्षी, प्राणी येतात . त्यांचे जवळुन निरीक्षण करता यावे म्हणून एक खास घर बांधण्यात आले आहे . तसेच पुण्याचा माळ, चाकाचा माळ, दांडा, गाडग्याचा माळ या ठिकाणी निरीक्षणा साठी उंच मनोरे उभारण्यात आले आहेत.

पाणवट्यावर विविध वन्यजीव पाणी पिण्यासाठी येत असतात अश्यावेळी नियुक्त केलेले कर्मचारी त्यानुसार गणना करून कार्यलयास अहवाल देत असतात.१४ ठिकाणी लाकडाच्या साह्याने बांधण्यात आलेल्या मचाणावर बसून हे कर्मचारी जागता पहारा देणार असल्याची माहितीही तुषार काळभोर यांनी दिली. सदरची गणना एक दिवसाची असून वन्यजीव पाणी पिण्यासाठी पाणी असलेल्या ठिकाणी येत असतात.विशेष खबरदारी म्हणजे कोणताही आवाज न करता व वन्यजीव यांच्या दृष्ठीस न पडता अत्यन्त सावधपणे ही गणना केली जात असल्याची माहिती यावेळी काळभोर यांनी दिली.फणसाड अभयारण्यात २७ पाण्याचे स्तोत्र असून त्यापैकी वन्यजीव मोठ्या प्रमाणात पाणी पिण्यासाठी येतात अशी ठिकाणे गणनेसाठी निवडण्यात आली आहे.फणसाड अभयारण्यात सध्या बिबट्यांची संख्या वृद्धींगत झालेली असून याचा वाढीव आकडा लवकरच समोर येणार आहे.येथे रानगवे यांची सुद्धा संख्या वाढली आहे कारण मुबलक पाणी व खाण्यासाठी असणारे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असल्याने येथे रानगवे वाढले आहेत.लवकरच गणना संपन्न झाल्यावर हे आकडे कळणार असल्याने वन्यजीव प्रेमी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

 ४५ कर्मचारी १४ ठिकाणच्या पाणवट्यावर

शुक्रवारी बौद्ध पौर्णिमा असल्याने चंद्राचा प्रकाश हा प्रखर असल्याने महाराष्ट्रातील सर्व अभयारण्यात आज वन्यजीवांची गणना केली जाते.आज सायंकाळी सहा ते सकाळी ७ वाजेपर्यंत वन्यजीव यांची गणना करण्यात येणार असून निसर्ग प्रेमी संघटना व फणसाड अभयारण्य कर्मचारी असे एकंदर ४५ कर्मचारी १४ ठिकाणच्या पाणवट्यावर विविध वन्यजीवांची गणना करणार असल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी तुषार काळभोर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -