घररायगडबांदेकर भावोजीच्या खेळ मांडीयेला कार्यक्रमाला ‘रेकॉर्ड ब्रेक‘ गर्दी

बांदेकर भावोजीच्या खेळ मांडीयेला कार्यक्रमाला ‘रेकॉर्ड ब्रेक‘ गर्दी

Subscribe

खोपोली-: शिवसेने (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) च्यावतीने कर्जत व खालापूर तालुक्यातील महिलांसाठी खास हळदी-कुंकू आणि मनोरजंनात्मक अभिनेते आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला (Bandekar Bhavoji’s Khel Mandiyela program in shivsena) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी दोन्ही तालुक्यातील महिलांची अक्षरशः झुंबड पडली होती. कर्जतच्या पोलीस मैदानात आयोजित या कार्यक्रमाने गर्दीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. तब्बल ३५ हजार महिलांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. कर्जतला एक सांस्कृतिक वारसा लाभला असून उपस्थित माता भगिनींच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून भरून भारावलो अशी प्रतिक्रीया शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी दिली.

- Advertisement -

सध्या मकरसंक्रांती सण होऊन गेल्याने महिलांच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाची रेलचेल सुरु सर्वत्र सुरु आहे. तर निवडणुकांचे वर्ष असल्याने हळदी-कुंकू समारंभाला सध्या राजकीय रंग येऊ लागला आहे. शिवसेनेकडून जानेवारी महिन्यात हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत व शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीकडून यंदा हळदीकुंकू कार्यक्रम भव्य ठेवण्यात आला होता.

यावेळी मंचावर शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आदेश बांदेकर, मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे-पाटील, जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संपर्कप्रमुख सुदाम पवाळी, महिला जिल्हा संघटक सुवर्णा जोशी, माथेरानच्या माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपजिल्हा संघटक अनिता पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे, काँग्रेचे तालुक्काध्यक्ष संजय गवळी यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.

- Advertisement -

या कार्यक्रमाला येणार्‍या प्रत्येक महिलेला सावंत यांच्याकडून मायेची साडी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर यासोबत लकी ड्रॉचे कुपन देखील देण्यात येत होते. मंचावर ३०० महिलांसह विविध खेळ, गप्पा, चर्चा करत कार्यक्रम पार पडला. मानाची पैठणी नेरळ भडवळ येथील भारती पाटील यांनी मिळवली तर या खेळात दर्शना दत्ता रुठे बीड या उपविजेत्या ठरल्या दरम्यान लकी ड्रॉचे कुपन लहान मुलांच्या हस्ते काढण्यात आले. त्यात सुनीता दशरथ हिलम (नावंढेवाडी) यांना मिक्सर, लताबाई किसान पाटील यांना वॉशिंग मशिन, माधुरी सुनील दळवी (खोपोली) यांना टीव्ही, अश्विनी नितीन दिघे (वावर्ले) यांना फ्रिज तर पहिले पारितोषिक स्कूटी गाडी हि सुवर्णा अनिल घोसाळकर यांना मिळाली. मान्यवरांच्या हस्ते घोसाळकर यांना स्कुटी देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -