घररायगडविनाकारण फिरतायं?.. सावधान..

विनाकारण फिरतायं?.. सावधान..

Subscribe

रस्त्यातच होणार अँटिजेन चाचणी

रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नसताना दुसरीकडे विनाकारण फिरणार्‍यांची संख्या देखील कमी होत नाही. त्यामुळे भर रस्त्यातच कोविड अँटिजेन चाचणी करण्याची मोहीम रायगड पोलीस आणि आरोग्य विभागाने हाती घेतली आहे.

संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळया दिवशी अचानक ही मोहीम राबविली जाणार आहे. गुरुवारी येथील एसटी स्टँड परिसरात विनाकारण फिरणारे, तसेच फळ विक्रेते, हॉटेलमधील वेटर अशा 102 जणांना थांबवून त्यांची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यात एका महिलेचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे, पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. घासे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

कोविडचा प्रादुर्भाव कमी होत नाही तरीदेखील अनेकजण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नागरिकांनी घराबाहेर, रस्त्यावर फिरू नये यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. ही प्रतिबंधात्मक कारवाई असल्याचे कदम यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -