घररायगडपनवेलमध्ये रेती माफियानवर मोठी कारवाई 

पनवेलमध्ये रेती माफियानवर मोठी कारवाई 

Subscribe

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या निर्देशां नंतर अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत 8 लहान, मोठे बार्ज 2 सक्षण पंप असलेल्या बोटी असा करोडो रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

 

पनवेल: तळोजा खारघर खाडी मध्ये सक्षण पंपाच्या माध्यमातून बेकायदेशीर रित्या रेती उपसा करणाऱ्यांवर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या कारवाईत 4 मोठे तर चार छोटे बार्ज पोलिसांनी ताब्यात घेतले असून, 2 सक्षण पंप असलेल्या बोटी देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत.

खारघर तळोजा खाडीत सक्षण पंपा च्या माध्यमातून मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेती उपसा सुरु असल्याचे पाहायला मिळत होते.बेकायदेशीर पणे सुरु असलेल्या या कृत्या मुळे खाडी पत्रात असलेली नैसर्गिक बेटे आणि कांदलवणाचा ऱ्हास होत असल्याने रेती उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. सातत्याने केल्या जात असणाऱ्या मागणी नंतरही अपुऱ्या साधन सामुग्री अभावी रेती उपसा करणाऱ्या विरोधात कारवाई करणे महसूल विभागाला शक्य होत न्हवते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिलेल्या निर्देशां नंतर अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईत 8 लहान, मोठे बार्ज 2 सक्षण पंप असलेल्या बोटी असा करोडो रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
5 सक्षण पंप नष्ट
ताब्यात घेण्यात आलेल्या बार्ज पैकी खारघर पोलिसांच्या ताब्यात 6 बार्ज देण्यात आले असून,2 बोटी एनआरआय पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.एक बोट गाळात रुतल्याने त्याच ठिकाणी ती बोट नष्ट करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.तसेच या कारवाईत 5 सक्षण पंप देखील नष्ट करून संबंधितानवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -