घररायगडमहाड औद्योगिक क्षेत्रात कोट्यावधीचे नुकसान

महाड औद्योगिक क्षेत्रात कोट्यावधीचे नुकसान

Subscribe

कारखान्यांतील तयार उत्पादनाचे ड्रम पाण्यात वाहून गेल्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

राज्यात अतिवृष्टीमुळे कोकणातील महाड चिपळूण या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आलेल्या महापुराने शहरासह परिसरातील औद्योगिक क्षेत्रात देखील हाहाकार माजवला आहे. कारखान्यांमध्ये जवळपास दहा फुटांच्या वर पाणी गेल्याने यंत्रणा नादुरुस्त झाल्या आहेत. तर पाण्याशी संपर्क आल्याने लासा सुपर जेनेरिक हा कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. हा संपूर्ण कारखाना जळून खाक झाला आहे.औद्योगिक परिसरातील लक्ष्मी, विनती हे दोन कारखाने देखील पाण्याशी संपर्कात आल्याने वायूगळती झाली.औद्योगिक क्षेत्रात कधी नव्हे इतके पुराचे पाणी आले. आसनपोई आणि बिरवाडी या दोन ठिकाणी पुराचे पाणी घुसले आणि औद्योगिक क्षेत्राला पुराने वेढा दिला. कारखान्यांतील कामगार पुराच्या पाण्याला घाबरून आधीच निघून गेले, तर उर्वरित कामगार वरच्या मजल्यावर जाऊन बसले. कंपन्यांमधील मशिनरी, रासायनिक पदार्थ, पाईप, कार्यालयीन साहित्य सर्वच पुराने आपल्याबरोबर नेले. सरंक्षक भिंती देखील पुराच्या पाण्याने कोलमडून पडल्या. अवाढव्य रिऍक्टरहीया पुराच्या पाण्याने आडवे केले.

कारखान्यांतील तयार उत्पादनाचे ड्रम पाण्यात वाहून गेल्यामुळे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्यात रासायनिक प्रक्रिया होऊन वायू गळतीची शक्यता होती. यामुळे परिसरातील गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याचे व्यवस्थापक वैंशपायन यांनी सांगितले. मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारखाना पुढील दोन महिन्यांसाठी बंद राहणार आहे. हिच स्थिती लासा, प्रिव्ही, विनती, सिक्वेन्ट, आपटे आदी कारखान्यांना अनुभवावी लागली आहे.

- Advertisement -

अफवांवर विश्वास ठेवू नका

लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी, महाड येथे वायूगळती होऊन मोठा स्फोट होण्याची अफवा पसरली होती. त्यामुळे नागरिक भयभीत होऊन मोठया प्रमाणात रस्त्यावर आले होते. तथापि लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी, महाड या ठिकाणी तज्ञ उपस्थित असून कोणताही धोका नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये व राहते घर सोडू नये. नागरिकांनी घाबरुन जावू नये व आपाआपल्या घरी परतावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे .


हेही वाचा – कोरोना, वादळ, पाऊस मुख्यमंत्र्यांच्या पायगुणामुळेच, पांढरे पाय आहेत का? बघितलं पाहिजे – नारायण राणे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -