घररायगडम्हसळेतील बौद्धवाडी मंजूर रस्त्याचे काम ठप्प; रस्ता खोदाईमुळे अपघाताची शक्यता

म्हसळेतील बौद्धवाडी मंजूर रस्त्याचे काम ठप्प; रस्ता खोदाईमुळे अपघाताची शक्यता

Subscribe

म्हसळे तालुक्यातील चिरगाव बागेची वाडी या गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावर ते चिरगाव बौद्धवाडी पर्यंत सुमारे २ कोटी मंजूर खर्चाचे २.५०० किमी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. हे काम करण्यासाठी सुप्रभात इन्फ्रा प्रा.लि.अलिबाग यांनी ठेकेदारी घेतली आहे. या कंपनीने मागील तीन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली मात्र हे काम पूर्ण न करताच अर्धवट अवस्थेत ठेवल्याने सद्यस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असल्याने आणि अर्धवट ठेवलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

म्हसळे: तालुक्यातील चिरगाव बागेची वाडी या गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सावर ते चिरगाव बौद्धवाडी पर्यंत सुमारे २ कोटी मंजूर खर्चाचे २.५०० किमी रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. हे काम करण्यासाठी सुप्रभात इन्फ्रा प्रा.लि.अलिबाग यांनी ठेकेदारी घेतली आहे. या कंपनीने मागील तीन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात केली मात्र हे काम पूर्ण न करताच अर्धवट अवस्थेत ठेवल्याने सद्यस्थितीत रस्त्याचे काम ठप्प असल्याने आणि अर्धवट ठेवलेल्या कामामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
संबंधित ठेकेदारा करवी रस्ता सुधारणा करणे कामात खुपच दिरंगाई होत आहे. ठेकेदाराने कामात दिरंगाई केली असून नवीन रस्ता तर झालाच नाही परंतु जो दगड मातीचा रस्ता होता त्याच्या दोन्ही बाजूला खोदून ठेवले आहे. अनेक ठिकाणी खोदून ठेवले असल्याने येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. रस्ता खोदून ठेवल्याने गावात वाहने येत नाही त्यामुळे नागरिकांना अडीच ते तीन किलोमीटर चालत जाऊन पायपीट करून दैनंदिन प्रवास करावा लागत आहे. मंजूर असलेल्या रस्त्याचे काम योग्य दर्जासह लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

सावर ते चिरंगाव हा मुख्य रस्ता असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील या मंजूर रस्त्याचे काम अजूनही पूर्ण झाले नाही त्यामुळे आमच्या गावातील नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे, दैनंदिन कामासाठी दगड धुरळा अंगावर घेऊन तालुक्यापर्यत पायपीट करावी लागते. त्याचबरोबर अर्धवट असलेल्या रस्त्याचे कामाचे बाबतीत संबंधित इंजिनिअर व ठेकेदार यांना अनेक वेळा कल्पना दिलेली असून रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून मिळावे अशी मागणी आहे.
– किशोर गुलगुले
माजी सरपंच तथा गाव अध्यक्ष, चिरगाव बागेचीवाडी

- Advertisement -

सावर ते चिरगाव बौद्धवाडी या रस्त्याचे कामाचे सद्यस्थिती बाबत मला काही माहिती नाही मी तेथील तालुका इंजिनिअर यांचेकडून माहिती घेणार आहे.
– आनंद गोरे
उपविभागयीय कार्यालय अलिबाग

सावर ते चिरगाव बौद्धवाडी रस्त्याचे काम सुरू आहे परंतु मागील काही दिवसांपासून संबंधित ठेकेदार यांना काम करण्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने अडचणी येत आहेत, तरीही सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून घेण्याचे आमचे उद्दीष्ट आहे.
– जसवंती आवेरे,
उपअभियंता माणगाव, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -