Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर रायगड रोहेतील कालवा पाणी प्रश्न पेटला; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

रोहेतील कालवा पाणी प्रश्न पेटला; ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण

Subscribe

रोहे: तालुक्यातील आंबेवाडी ते नीवी कालवा पाणी प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी ग्रामस्थांनी रोहे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असल्याने सर्वत्र खळबळ उडाली. कालव्याचे पाणी प्रश्न पेटला आहे, पाण्यासाठी नागरीकांना उपोषण करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. आंबेवाडी ते निवी ग्रामस्थांना गेले १५ वर्ष पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड यांनी कालव्याचा पाणी बंद केल्याने विहिरी, नाले, बुजून गेले. शेती ओसाड झाली, शेतकरी हवालदिल झाला. पशुपक्षी गुरेढोरे, पाण्यासाठी भटकंती करत आहेत.

रोहे: तालुक्यातील आंबेवाडी ते नीवी कालवा पाणी प्रश्न गंभीर बनला असून पाण्यासाठी ग्रामस्थांनी रोहे तहसिल कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले असल्याने सर्वत्र खळबळ उडाली. कालव्याचे पाणी प्रश्न पेटला आहे, पाण्यासाठी नागरीकांना उपोषण करावे लागत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
आंबेवाडी ते निवी ग्रामस्थांना गेले १५ वर्ष पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. रायगड पाटबंधारे विभाग, कोलाड यांनी कालव्याचा पाणी बंद केल्याने विहिरी, नाले, बुजून गेले. शेती ओसाड झाली, शेतकरी हवालदिल झाला. पशुपक्षी गुरेढोरे, पाण्यासाठी भटकंती करत आहेत. या विषयी ग्रामस्थांनी जोरदार आवाज उठवला कालव्याच्या पाण्याची मागणी केली, अधिवेशनात विषय गाजला. ग्रामस्थांनी पाण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला परंतु कालव्याचा पाणीप्रश्न लालफितीत अडकल्याने अखेर स्थगित केलेले उपोषण १ मे महाराष्ट्र दिनी ग्रामस्थांनी सुरु केले आहे. जो पर्यंत कालव्याला पाणी सोडले जात नाही, तो पर्यंत आंदोलन उपोषण सुरुच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार अदिती तटकरे यांनी उपोषणस्थळाला भेट देऊन सविस्तर चर्चा केली. परंतु आंदोलनकर्ते उपोषणावर ठाम राहिले. उपोषणास माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, रोहे सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितिन परब मराठी पत्रकार परिषदेचे मिलिंद आष्टीवकर ,भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, अमित घाग, माजी उपसरपंच अमित मोहिते, मुस्लिम समाजाचे नेते उस्मान रोहेकर, प्रशांत देशमुख, नरेश पडवळ आदी प्रतिष्ठित नागरीकांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून ग्रामस्थांना समर्थन दिले. यावेळी कालवा समन्वय समितीचे विठ्ठल मोरे, राजेंद्र जाधव, सागर भगत, तुकाराम भगत, रुपेश साळवी, सूनील बामुगडे, रुपेश शिंदे, दीपक भगत, योगेश राऊत, प्रशांत राऊत, संतोष भोकटे, राकेश बामूगडे, हेमंत माने, शहानवाज मुकादम, संदेश मोरे, ज्ञानेश्वर बामुगडे, शंकर साळवी, दीपक कळंबे, नंदकुमार बामुगडे, नरेश बामुगडे, रुपेश बामुगडे, सुरेश साळवी, रुपेश शिंदे.सतीश भगत, संतोष टेंबे, निखिल भगत यांच्यासह अनेक ग्रामस्थ, महिला मोठ्या प्रमाणात उपोषणास बसले आहेत. आंदोलनकर्ते जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले. दरम्यान, या एकूणच प्रकरणाबाबत प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कालव्याच्या पाणी प्रश्नावर जोपर्यंत प्रशासन लेखी आश्वासन देत नाहीत, तो पर्यंत उपोषण सोडणार नाही, मेलो तरी बेहत्तर पण पाण्यासाठी आंदोलन करणार आहोत.
– राजेंद्र जाधव,
आंदोलनकर्ते, सामाजिक कार्यकर्ते

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -