श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव उत्साहात साजरा; श्री अष्टविनायक क्षेत्र पालीत फुलला भक्तीमळा

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव आणि श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आला.

पाली:  अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पालीतील श्री बल्लाळेश्वराचा माघी मासोत्सव आणि श्री बल्लाळेश्वराचा जन्मोत्सव बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. यावेळी धार्मिक कार्यक्रम व विधी करण्यात आले. बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भक्तांच्या रांगा लागल्या होत्या. संपूर्ण परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते. जन्मोत्सवाला बाळ गणेशाच्या मूर्तीला पाळण्यात टाकून भक्तिभावाने पाळणा हलविण्यात आला.
यावेळी बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र अरविंद गद्रे, उपाध्यक्ष वैभव मोहन आपटे, विश्वस्त अमोल अशोक साठे, विश्वास विद्याधर गद्रे, प्रमोद जगन्नाथ पावगी, अरुण दत्तात्रय गद्रे आणि डॉ. पिनकिन सदानंद कुंटे आदींसह मंदिर पुजारी व गुरव, धंनजय गद्रे गुरुजी आदी मान्यवर व भक्त उपस्थित होते. जन्म सोहळ्याच्या कीर्तनास व इतर कार्यक्रमात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
माघी महोत्सवानिमित्त प्रशासन व देवस्थान यांच्या समन्वयातून योग्य नियोजन करण्यात आले होते. बल्लाळेश्वर मंदिर व परिसरात रोषणाई, रांगोळी व सजावट करण्यात आली होती. प्रशासनाने यात्रा आणि धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी आले आहेत. परिणामी उत्सवात यावर्षी रस्त्यावर फक्त छोटी खेळण्यांची व इतर छोटी दुकाने लागली होती. तसेच काही विक्रेते, फेरीवाले, हातगाडीवाले, मिठाईवाले होते.यावर्षी श्री गणेशाची पालखी परंपरा नुसार काढण्यात आली. लोकांना पालखीला जागोजागी ओवाळणी करत मनोभावे दर्शन घेतले.

देवस्थानचे सुरक्षारक्षक तैनात

भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील लाभ घेतले कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाली पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच देवस्थानचे सुरक्षारक्षक देखील तैनात करण्यात आले आहेत. वाहने राजीप शाळेच्या बाजूने भक्त निवास क्रमांक एक जवळून वळविण्यात आली होती.

मोफत पार्किंगची व्यवस्था केली आहे. भक्तनिवास खुले आहेत. तसेच जागोजागी सुरक्षारक्षक नेमले आहेत. भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा दिल्या जात आहेत.
– जितेंद्र अरविंद गद्रे,
अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान