घररायगडमहाडनजिक महामार्गावर रासायनिक टँकर पलटी; महामार्ग तीन तास ठप्प 

महाडनजिक महामार्गावर रासायनिक टँकर पलटी; महामार्ग तीन तास ठप्प 

Subscribe

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव जवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसीमध्ये रसायन घेऊन येणारा टँकर अचानक पलटी झाल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

महाड: मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव जवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास महाड एमआयडीसीमध्ये रसायन घेऊन येणारा टँकर अचानक पलटी झाल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्ग वाहतूक पोलीस आणि महाड शहर पोलीस यांच्या अथक प्रयत्नांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली.

लुपिन लिमिटेड तारापूर एमआयडीसीमधून महाडमधील जेट इन्सुलेशन प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यासाठी स्पेनट ऑरगॅनिक सॉलव्हंट घेऊन येणारा टँकर (एमएच०४/बीजी ८१३) हा एका वळणावर मुंबई-गोवा महामार्गावर पलटी झाला. पलटी झाल्यानंतर महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड पोलीस उप निरीक्षक प्रवीण धडे, सहाय्यक फौजदार गणेश भिलारे, पोलीस हवालदार नंदन निजामपूरकर, पोलीस नाईक अजय मोहित, पोलीस शिपाई सनील पाटील, तसेच शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य पाहता महामार्गावरील वाहतूक बंद करत महाड औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दल तसेच सेफ्टीचे मार्क कॉर्डिनेटर चंद्रकांत देशमुख, शीतल पाटील, रोहन पाटील, यांना त्या ठिकाणी पाचारण केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची काळजी घेत भरलेला टँकर सुरक्षित बाजूला करत तीन तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
======

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -