घररायगडचेंढरे-संभाजी वाडा येथील बेपत्ता युवतींचा सुगावा

चेंढरे-संभाजी वाडा येथील बेपत्ता युवतींचा सुगावा

Subscribe

अलिबाग-अलिबाग तालुक्यातील चेंढरे (Chendare and Sambhaji wada missing girls) येथील युवती (वय १८ वर्षे) ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार युवतीची आई हिने अलिबाग पोलिस ठाण्यात दिली होती. तसेच संभाजी वाडा येथून १९ वर्षीय युवती ही बेपत्ता झाली असल्याची तक्रार युवतीचे वडील यांनीसुद्धा अलिबाग पोलिस ठाण्यात दिली होती.बेपत्ता झालेल्या दोन्हीं युवती या गुजरात राज्यातील पिपलग, पेटली वगो तालुका खेडा जिल्हा नदियाड येथे सापडल्या आहेत.

दोन्ही बेपत्ता झालेल्या युवती या मैत्रीणी असून त्या नेटच्या परीक्षेची तयारी करत होते. तसेच त्यातील संभाजी वाडा येथील युवती हिला क्टिंग, डान्सिंगमध्ये करियर करायचे होते मात्र त्यांना घरातून विरोध होता. दोन्ही युवती त्यांचा इंस्टाग्रामवरील मित्र अफजर फरुकमिया मलिक सोबत संपर्कात होते. अफजल हा डोळयांनी दिव्यांग असून ऑनलाईन नोवेलस लिहीतो असे भासविण्यात आले होते.अफजल आणि संभाजी वाडा येथील युवतीची ओळख चेंढरे येथील युवतीने दोन महिन्यापूर्वी करून दिली होती. तदनंतर ते एकमेकांच्या संपर्कात होते. अफजल आणि चेंढरे येथील युवतीने एक महिन्यापूर्वी घर सोडून जाण्याचे ठरविले होते. त्याची कल्पना तिने दिली होती. त्यावेळी संभाजी वाडा येथील युवतीने सुद्धा सोबत येते असे सांगितले.

- Advertisement -

४ नोव्हेंबरला या दोघींनी ठरल्याप्रमाणे पळून जाण्याचे नियोजन केले. अलिबाग येथून पुणे येथे रेल्वे स्टेशन त्यानंतर जोधपूर एक्सप्रेसने गुजरात गाठले. त्यानंतर अफजल याचा पत्ता शोधून त्याचे घर गाठले.अफजल सोबत नोकरी व राहण्यासाठी घर शोधत होतो. परंतू आम्हाला रुम व जॉब मिळाला नाही.अफजलच्या घरी आई वडीलांसोबत रहिले. ९ नोव्हेंबरपासून अलिबाग पोलिस घेत त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे स्वाधीन केले.

रायगडचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश कदम, प्रतीक सावंत, विलास आंबेटकर यांच्या पथकाने यांचा छडा लावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -