घररायगडपनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्मार्ट सोसायटी स्पर्धा, सात लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात

पनवेल विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात स्मार्ट सोसायटी स्पर्धा, सात लाख रुपयांच्या बक्षिसांची खैरात

Subscribe

विविध सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांना स्पर्धा समजून सांगायचे व त्यांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी सोसायटी किंगडम या संस्थेला देण्यात आलेली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत सोसायटी किंगडमचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेत जाऊन स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल पत्रकाद्वारे जागृती करतील, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ठरविलेल्या निकषांबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अवगत करून देतील.

पनवेल विधानसभा मतदार संघ क्षेत्रातील सोसायट्यांसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि तालुका काँग्रेस यांच्यावतीने स्मार्ट सोसायटी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. बुधवारी २ मार्च रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आर. सी. घरत यांनी पत्रकार परिषद घेऊन या स्पर्धेची घोषणा केली.

सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत चालली आहे. त्याचबरोबर त्यांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. एक सुसंस्कृत उत्कृष्ट सहकारी गृहनिर्माण संस्था कशी असावी? याचे उत्तम उदाहरण शोधण्यासाठी व त्याचा आदर्श इतर संस्थांनी घ्यावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व संस्था, त्यांचे पदाधिकारी व सदस्य यांच्यातील संबंध कसे सौहार्दाचे असावेत या सार्‍याची जाण अशा सहकारी गृहनिर्माण संस्थांना व त्यांच्या पदाधिकार्‍यांना व्हावी हा देखील उद्देश या स्पर्धेचा आहे. ३१ मार्च २०२२ ही स्पर्धेत सहभागी होण्याची अंतीम तारीख असणार आहे.

- Advertisement -

विविध सोसायट्यांमध्ये जाऊन त्यांना स्पर्धा समजून सांगायचे व त्यांना सहभागी करून घेण्याची जबाबदारी सोसायटी किंगडम या संस्थेला देण्यात आलेली आहे. या एक महिन्याच्या कालावधीत सोसायटी किंगडमचे प्रतिनिधी प्रत्येक संस्थेत जाऊन स्पर्धेत सहभागी होण्याबद्दल पत्रकाद्वारे जागृती करतील, स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी ठरविलेल्या निकषांबद्दल संस्थेच्या पदाधिकार्‍यांना अवगत करून देतील. या स्पर्धेत सहभागी होणा-या संस्थाकरिता सभासद संख्येनुसार गट पाडले आहेत. क गटातील विजेत्या स्मार्ट सोसायटीला ५१ हजार रुपये, ब गट सोसायटीला २५ हजार रुपये, तर अ गट सोसायटीला २१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येईल.

पनवेल, नवीन पनवेल, खादा कॉलनी (आसूडगावसह), कळंबोली – कामोठे, खारघर व नावडे, तळोजा फेज १ व २ (प्रभाग १ व २) ही सात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शहरे, तसेच ४ जिल्हा परिषद हद्दीतील व पनवेल विधानसभा क्षेत्रातील आदई, विचुंबे,उसर्ली, सुकापूर, आकुर्ली, कोप्रोली, नेरे, करंजाडे, पळस्पे आदी नागरी वस्त्या असणारी गावे अशा एकूण ८ विभागांसाठी स्वतंत्र स्पर्धा असणार आहेत. प्रत्येक विभागवार रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -