घररायगडराहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ उरणमध्ये काँग्रेसची निदर्शने

राहुल गांधींवरील कारवाईच्या निषेधार्थ उरणमध्ये काँग्रेसची निदर्शने

Subscribe

लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. या निदर्शनातून मोदी सरकार तसेच केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मोदी सरकार, केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला.

उरण: लोकसभा सचिवालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक झाले असून या अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. या निदर्शनातून मोदी सरकार तसेच केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन मोदी सरकार, केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला.महेंद्र घरत यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकार वर जोरदार प्रहार केला.मोदी सरकार हे हुकूमशाही असल्याचे सांगत लोकशाहीला दडपण्याचे काम मोदी सरकार करत आहे. मोदी सरकार मुळे आज लोकशाही धोक्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या लोकसभा सदस्यत्व रद्दचा आम्ही जाहीर निषेध करतो. भाजपचा, केंद्र शासन व मोदी सरकारचा निषेध केला. यावेळी उरण तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनीही भाजप, केंद्र शासन, मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही मूल्ये धोक्यात आली असून आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेवटपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत.राहुल गांधी यांनी सात्यत्याने भाजप मधील भ्रष्टाचार बाहेर काढला. भाजप नेत्यांची अनेक चुकीच्या गोष्टी बाहेर काढल्या. निरव मोदी, मेहुल चोकशी, अदानी, मल्ल्या असे अनेक उद्योजकांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला आहे. भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई आदी मुद्द्यावर राहुल गांधी सात्यत्याने आवाज उठवित आहेत.आंदोलने करत आहेत. लढा देत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे.असे विनोद म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून मत व्यक्त करत भाजपचा व केंद्र शासनाचा निषेध केला.
या प्रसंगी वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील,
इंटक रायगड जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, मार्तंड नाखवा, कमलाकर घरत, केशव घरत, जिल्हा उपाध्यक्षा संध्या ठाकूर, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत,निर्मला पाटील, भारती कांबळे, गोपीनाथ मांडेलकर,अशोक भगत, वैभव ठाकूर, अफशा मुकरी आदी पदाधिकार्‍यांसह काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा सरचिटणीस ठाकूर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला तर तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. लोकशाही मूल्ये धोक्यात आली असून आम्ही सर्व काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते शेवटपर्यंत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी आहोत, असे जाहीर केले. राहुल गांधी यांनी सात्यत्याने भाजपमधील भ्रष्टाचार बाहेर काढला. भाजप नेत्यांची अनेक चुकीच्या गोष्टी बाहेर काढल्या. निरव मोदी, मेहुल चोकशी, अदानी, विजय मल्ल्या असे अनेक उद्योजकांनी केलेल्या भ्रष्टाचार विरोधात आवाज उठविला आहे. भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई आदी मुद्द्यावर राहुल गांधी सातत्याने आवाज उठवित आहेत.आंदोलने करत आहेत. लढा देत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सूड बुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे, असेही म्हात्रे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -