घररायगडद्रूतगती मार्गावर कंटेनरची सहा वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर

द्रूतगती मार्गावर कंटेनरची सहा वाहनांना धडक; एकाचा मृत्यू, दोन गंभीर

Subscribe

मुंबई पुणे द्रूतगती मार्गावर सोनवारी रात्री ११.१५ वाजतच्या सुमारास मुंबई लेन वर कि.मी. ३६/८०० जवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खोपोली: सारिका सावंत
मुंबई पुणे द्रूतगती मार्गावर सोनवारी रात्री ११.१५ वाजतच्या सुमारास मुंबई लेन वर कि.मी. ३६/८०० जवळ कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कंटेनर (आरजे१९/जीएच४४९७) चा पुणे ते मुंबई असा प्रवास करत असताना किलोमीटर ३६ /८०० या ठिकाणी आल्यावर ब्रेक फेल झाला. त्याने इको कार (एमएच०३/डिए ८२३३), क्रेटा कार (एमएच४३/बीएन९११४), टाटा जेस्ट कार आणि हुंडाई कार (एमएच४७/के ६११२) किया कार (एमएच०३/इबी९७७७) आणि स्विफ्ट कार (एमएच०२/बीएम९०२२) या वाहनांना धडक दिली.
कंटेनरची धडक एवढी जबरदस्त होती की धडक दिलेल्या वाहनातील प्रवाशांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. अपघात झाल्याचे समजताच आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, बोरघाट वाहतूक पॉलिसी यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, आरटीओ, लोकमान्य म्बुलन्स यंत्रणा आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम घटनास्थळी पोचली. सर्व जखमींना खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले तेथे प्राथमिक उपचार करून जखमींना एमजीएम रुग्णालय पनवेल येथे शिफ्ट केले. त्या दरम्यान हात तुटल्याने रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात होऊन रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी सुभाष पंढरीनाथ चौगुले (४५ ,वाशी, नवी मुंबई)हे उपचारासाठी नेताना मृत्यू पावले. तर चंद्रकला सुभाष चौगुले (४३,वाशी), अमित कुमार श्रीहरिराम थठेर (३०, भांडुप) कौसर अली शाह ( ४०, भांडुप), आफताब समीउल्ला आलम, (१९,भांडुप) अफसर अली मोहम्मद अली (३६,वडाळा) हे जखमी आहेत. त्यांना पनवेल येथे एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.

- Advertisement -

वाहतूक केली सुरळीत
सदर कंटेनर अपघाताच्या ठिकाणाहून पळून जात असताना बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणेने पोलीस उपनिरीक्षक योगेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग करून कंटेनर अडवून चालकाला ताब्यात घेतले. अपघात खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत झाल्याने सहा. पो. नि. हरेश काळसेकर, पोलीस उप निरक्षक आलोक खीसमतराव यांनी आपल्या कर्मचारी वर्गासह पोहचून घटनेची चौकशी सुरू केली. अपघात घडल्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांनी तातडीने उपाययोजना अवलंबत बाधित वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

तहसीलदार आयुब तांबोळी यांच्याकडून कौतुक
खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांनी रात्री उशिरापर्यंत मदत कार्याचा आढावा घेतला. खोपोली नगरपालिका रुग्णालयातील आरोग्य कर्मचार्‍यांना सतर्क करून योग्य उपचार देण्यासाठी खोपोलीचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी निर्देश दिले होते त्यामुळे प्राथमिक उपचार तातडीने होऊन जखमींना पुढील उपचारासाठी रवाना करण्यात मदत झाली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठीच्या टीमने दाखवलेल्या सतर्कतेबद्दल तहसीलदार आयुब तांबोळी यांनी कौतुक केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -