घररायगड350 वर्षांपूर्वीचा राज्याभिषेक सोहळा त्या काळातील अभूतपूर्व आणि विशेष अध्याय - नरेंद्र...

350 वर्षांपूर्वीचा राज्याभिषेक सोहळा त्या काळातील अभूतपूर्व आणि विशेष अध्याय – नरेंद्र मोदी

Subscribe

रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज (2 जून) तिथीनुसार 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा रायगडावर पार पडतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक राजकीय दिग्गज मंडळी, शिवप्रेमी आणि मावळ्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ मॅसेजद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन केले. (Narendra Modi say Coronation ceremony 350 years ago an unprecedented and special chapter of that time)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केले. यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपल्या सर्वांसाठी नवी चेतना, नवी ऊर्जा घेऊन आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा 350 वर्षांपूर्वीचा त्या काळातील अभूतपूर्व आणि विशेष अध्याय आहे. इतिहासाच्या त्या अध्यायातून उदयास आलेल्या स्वराज्याच्या, सुशासनाच्या आणि समृद्धीच्या महान कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात. राष्ट्रीय कल्याण आणि लोककल्याण हे त्यांच्या कारभाराचे मूलभूत घटक होते. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – VIDEO : छत्रपती शिवाजी महारांजाचे राष्ट्रीय स्मारक दिल्लीत उभारणार, देवेंद्र फडणवीसांचे शिवराज्याभिषेक सोहळ्यात आश्वासन

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विश्वास जनतेच्या मनात बिंबवला
मोदी म्हणाले की, शेकडो वर्षांच्या गुलामगिरीने देशवासीयांचा आत्मविश्वास हिरावून घेतला होता, अशावेळी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणे कठीण काम होते. मात्र त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमण करणाऱ्यांचा विरोध केला नाही तर स्वराज्य शक्य आहे हा विश्वास जनतेच्या मनात बिंबवला.

- Advertisement -

पंतप्रधानांकडून शिवाजी महाराजांच्या धोरणात्मक क्षमतेचेही कौतुक
मोदींनी शिवाजी महाराजांच्या धोरणात्मक क्षमतेचे कौतुक करताना सांगितले की, त्यांची शासनप्रणाली आणि धोरणे आजही समर्पक आहेत. भारताची क्षमता ओळखून शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे नौदलाचा विस्तार केला तो आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यामुळे गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन भारताने नौदलाला गुलामगिरीतून मुक्त करू शकलो हे आपल्या सरकारचे भाग्य आहे. ब्रिटिश राजवटीची ओळख असलेले चिन्ह शिवाजी महाराजांच्या राजेशाही शिक्काने बदलली आहे. नौदलाच्या ध्वजात बदल करताना भारत सरकारने सेंट जॉर्ज क्रॉस काढून टाकला आहे. नवीन ध्वजात एका बाजूला सत्यमेव जयते लिहिले आहे, तर दुसऱ्या बाजूला अँकर बनवले आहे. हा शिवाजी महाराजांचा राजेशाही शिक्का असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -