घररायगडश्रीवर्धनमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी मोठमोठ्या वृक्षांची तोड

श्रीवर्धनमध्ये रस्ता रुंदीकरणासाठी मोठमोठ्या वृक्षांची तोड

Subscribe

श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, म्हसळे या मुख्य मार्गावर काही ठिकाणया रस्त्याचे रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मोठमोठ्या वृक्षांची तोड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, आंबा, काजू, यासारखे मोठमोठे वृक्ष त्याचप्रमाणे टाकळा, किंजळ, आईन अशा प्रकारचे वृक्ष तोडण्यात आले आहेत. जुन्या असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष असल्यामुळे संपूर्ण मार्गावरती एक प्रकारे सावली असायची. परंतु रस्ता रुंदीकरण होणे ही काळाची गरज होती. त्यामुळे हे वृक्ष तोडणे क्रमप्राप्त होते, असे सांगितले जाते. मात्र यामुळे रस्त्यालगतची सावली आता हरपली असून भविष्यात ती पुन्हा मिळवायची असेल तर येत्या पावसाळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रमी आणि सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.

श्रीवर्धन: तालुक्यातील श्रीवर्धन, म्हसळे या मुख्य मार्गावर काही ठिकाणया रस्त्याचे रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेक मोठमोठ्या वृक्षांची तोड केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, आंबा, काजू, यासारखे मोठमोठे वृक्ष त्याचप्रमाणे टाकळा, किंजळ, आईन अशा प्रकारचे वृक्ष तोडण्यात आले आहेत. जुन्या असलेल्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष असल्यामुळे संपूर्ण मार्गावरती एक प्रकारे सावली असायची. परंतु रस्ता रुंदीकरण होणे ही काळाची गरज होती. त्यामुळे हे वृक्ष तोडणे क्रमप्राप्त होते, असे सांगितले जाते. मात्र यामुळे रस्त्यालगतची सावली आता हरपली असून भविष्यात ती पुन्हा मिळवायची असेल तर येत्या पावसाळ्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्त्याच्या दुतर्फा पुन्हा वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रमी आणि सामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
रस्त्याच्या कडेला असलेले वृक्षतोड केल्याशिवाय रस्ता रुंदीकरण करणे अशक्य होते, असे सांगितले जात असले तरी वृक्षतोडीमुळे वृक्षप्रेमी,पर्यावरणप्रेमी आणि सामान्य जनताही दु:खी असून उन्हाळ्यात वाहन चालकांना अनेक वेळा रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडेच सावली देत होते. त्यामुळे पुन्हा वृक्ष लागवड केल्यास रस्ता सुंदर दिसेल, या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अबाधित राहील तेच रस्त्यावर सावलीचा आधार होईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
श्रीवर्धन, म्हसळे या मुख्य मार्गाप्रमाणेच श्रीवर्धन बोरली, दिघी मार्गावरही वृक्षतोड झालेली आहे. त्या ठिकाणीही वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. आराठी ते जसवली तळे या मार्गावर रस्ता रुंदीकरण करून झाल्यानंतर मोर्‍यांमध्ये पाईप टाकण्याचे काम करण्यात आले. त्यामुळे त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खड्डा पडलेला असल्यामुळे अनेक वाहन चालकांना आपले वाहन चालवताना काळजी घ्यावी लागते.सदर खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्या ठिकाणी मोर्‍यांच्या पाईपलाईन टाकून झालेल्या आहेत, अशा ठिकाणी तातडीने डांबरीकरण करावे अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -