घररायगडउरण-पनवेल मार्गावरील जीर्ण पुलावरून धोकादायक वाहतूक

उरण-पनवेल मार्गावरील जीर्ण पुलावरून धोकादायक वाहतूक

Subscribe

उरण-पनवेल मार्गावरील पूल कमकुवत झाल्यामुळे त्यावरून अवजड वाहनांनी मार्गक्रमण करू नये, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडकोकडून एक महिन्यापूर्वी सादर करण्यात आला आहे.

उरण-पनवेल मार्गावरील पूल कमकुवत झाल्यामुळे त्यावरून अवजड वाहनांनी मार्गक्रमण करू नये, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सिडकोकडून एक महिन्यापूर्वी सादर करण्यात आला आहे. परंतु त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे आजही पावसाळ्यात पुलावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते.त्यामुळे रात्री अपरात्री धोकादायक पूल कोसळला आणि जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येत आहे.

जीर्ण पुलासंदर्भात सिडकोकडे पत्रव्यवहार केला आहे.
– सी. बी. बांगर, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी फुंडे ग्रामपंचायत हद्दीतील सिडकोच्या अखत्यारीत येणारा पूल कोसळण्याची घटना घडली होती. या अपघातात एका निष्पाप प्रवासी कामगाराला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर तालुक्यातील सर्व पुलांचे सिडकोने आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. त्यानुसार पुलांची पाहणी करण्यात आली असता सिडकोच्या द्रोणागिरी नोड कार्यालयासमोरील उरण- पनवेल मार्गावरील सा. क्र. ४/०० वरील पूल जीर्ण झाला असल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला.

सिडकोकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारचे पत्र सादर केलेले नाही.
– भगवान साळवे, उपअभियंता, सिडको

- Advertisement -

शासनाच्या आदेशानुसार खबरदारी म्हणून पनवेलकडे जाण्यार्‍या अवजड वाहनांनी भेंडखळ बीपीसीएल मार्गाचा वापर करावा, असे सूचना फलक सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लावण्यात आले. परंतु सिडको आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आजही पावसाळ्यात जीर्ण झालेल्या पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच सिडकोच्या उप अभियंत्यांची भेट घेऊन या धोकादायक पुलावरून अवजड वाहनांची वर्दळ बंद करून नवीन पूल बांधण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

हेही वाचा –

जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणातील ‘त्या’दोषी अधिकाऱ्यावर क्षुल्लक कारवाई

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -