घररायगडकर्जत-भिसेगाव भुयारी मार्गाची मागणी; नगरपरिषदेला निवेदन 

कर्जत-भिसेगाव भुयारी मार्गाची मागणी; नगरपरिषदेला निवेदन 

Subscribe

कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील भिसेगाव ते कर्जत भुयारी मार्ग होण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली होती. त्याप्रमाणे काम होणार असल्याचे लोकप्रतिनिधींचे बॅनरही झळकविण्यात आले होते. मात्र नावाच्या वादावरून भुयारी मार्गाचा निधी रखडला याचा नाहक त्रास भिसेगावच्या नागरिकांना होत असल्याने याबाबत स्थानिकांच्यावतीने नगरपरिषदेला निवेदन दिले असून त्याद्वारे श्रेयवादाचे राजकारण सोडून भुयारी मार्ग मंजूर करा अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे

कर्जत: नगरपरिषद क्षेत्रातील भिसेगाव ते कर्जत भुयारी मार्ग होण्यासाठी शासनाकडून मंजुरी मिळाली होती. त्याप्रमाणे काम होणार असल्याचे लोकप्रतिनिधींचे बॅनरही झळकविण्यात आले होते. मात्र नावाच्या वादावरून भुयारी मार्गाचा निधी रखडला याचा नाहक त्रास भिसेगावच्या नागरिकांना होत असल्याने याबाबत स्थानिकांच्यावतीने नगरपरिषदेला निवेदन दिले असून त्याद्वारे श्रेयवादाचे राजकारण सोडून भुयारी मार्ग मंजूर करा अन्यथा उपोषण केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे
कर्जत ते भिसेगाव भुयारी मार्ग झाला पाहिजे यासाठी नगरपरिषदेचे आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे आणि बांधकाम विभागाचे अभियंता मनीष गायकवाड यांच्याकडे आरटीआय शहर अध्यक्ष अमोघ कुळकर्णी, नगरसेवक सोमनाथ ठोंबरे तर ग्रामस्थ प्रकाश हजारे, मिलिंद दिसले,संजय हजारे,चेतन कडू,प्रफुल निकम यांनी निवेदन दिले आहे.
गेले अनेक दिवसांपासून भुयारी मार्ग होण्यासाठी बैठक घेणे, चर्चा करणे यावर नियोजन करण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते कुळकर्णी यांच्या माध्यमातून होत होते. मंजूर झालेला निधी नक्की कश्यामुळे रखडला गेला याबाबत नगरपरिषदेमध्ये पाठपुरावा सुरू होता. एकीकडे काम मंजूर झाल्याचे नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी व मतदार संघातील लोकप्रिनिधींनी यांनी बॅनर झळकवून नावावरून वाद निर्माण करून निधी रखडला गेला असल्याचे समजले तर दुसरीकडे भुयारी मार्गासंदर्भात नगरपरिषदेला पत्र आले नसल्याचे प्रशासनाने सांगितले. त्यामुळे भिसेगावकरांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाल्याने अखेर त्याचा उद्रेक होऊन खर खोटं काय आहे हे लवकर खुलासा करावा अन्यथा उपोषण छेडण्यात येईल असा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आला आहे.
नगरपरिषद हद्दी मधील भिसेगाव ते कर्जत यांच्या मध्यभागी रेल्वे मार्ग असल्याने गेले त्या परिसरातील नागरिकांचा ३८ वर्षा पासून वाहने ये -जा करण्यासाठीचा मार्ग बंद केला आहे.तो मार्ग चालू करण्याकरिता अनेक आंदोलने आणि मोर्चे देखील या भागातील नागरिकांनी केले परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. कर्जत नगरपरिषदेला भिसेगाव मधून अंदाजे १५ टक्के घरपट्टी दरवर्षाला मिळत असून या परिसरातील मुख्य अडचणी आहेत त्या सोडविले गेले नाही. कोणतीही सुविधा आपल्या नगरपरिषद प्रशासनाकडून मिळाली नसून नागरिकांना सुमारे ५ किलोमीटरचा फेरफटका शहरामध्ये येण्याकरिता हॉस्पिटल, मार्केट अथवा अन्य खरेदीकरिता नाईलाजाने मारावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नगरपरिषदेमध्ये जर भुयारी मार्गा संदर्भात पत्र आले नाही तर कोणत्या अनुषंगाने तातडीची सभा घेऊन नावाचा ठराव घेण्यात आला होता. याचा खुलासा करावा.
– सोमनाथ ठोंबरे,
नगरसेवक, कर्जत नगरपरिषद _

- Advertisement -

गेले अनेक वर्षापासून भिसेगावच्या समस्या सोडविण्यासाठी उपोषणे, आंदोलने करावे लागत आहे. तरी देखील समस्या सोडविण्यास जाणूनबुजून विलंब लावत आहे. रेल्वे ट्रॅकच्या पलीकडे भिसेगाव असल्याने छोट्या – मोठ्या कामांसाठी लांबचा वळसा घालून ये जा करावे लागते त्यामुळे वेळ वाया जातो. जर भुयारी मार्ग मंजूर झाला होता तर नावाचे राजकारण करून नाहक नागरिकांना त्रास देण्याचे काम नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.
– प्रकाश हजारे,
ग्रामस्थ, भिसेगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -