घररायगडपावसातच उरकावा लागतोय अंत्यसंस्कार,पेणमधील स्मशानभूमीची दुरावस्था

पावसातच उरकावा लागतोय अंत्यसंस्कार,पेणमधील स्मशानभूमीची दुरावस्था

Subscribe

नगर पालिकेच्या वैकुंठधाम स्मशानभूमीची दुरावस्था झाली असल्याने भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येथील लोकांवर आली आहे.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या या शहरासाठी भोगावती नदी किनारी वैकुंठधाम स्मशानभूमी आहे. यात पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन शवदाहिनी आहेत, तर एक डिझेलवर चालणारी शवदाहिनी आहे. डिझेलवर चालणार्‍या शवदाहिनीला काही दिवसांपूर्वी आग लागल्याने बंद पडली आहे. यामुळे पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र शेड असलेल्या शवदहिनीवर पत्रेच नसल्याने भर पावसात अंत्यसंस्कार उरकावा लागत आहे.

- Advertisement -

डिझेल शवदाहिनी बंद असल्याने कोरोनाबाधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात देखील मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यातच दुसर्‍या शवदाहिनीची दुरवस्था झाली असल्याने नागरिकांत नगर पालिकेच्या भोंगळ कारभाराविरोधात रोष व्यक्त होत आहे.

नुकत्याच झालेल्या वादळात स्मशानभूमीच्या शेडवरील पत्रे सरकले आहेत. याचे तातडीने काम करण्यात येत आहे.
-अर्चना दिवे, मुख्याधिकारी,महाड नगर पालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -