Tuesday, April 20, 2021
27 C
Mumbai
घर रायगड देवपाडा- वंजारपाडा प्रवासाने हाडे खिळखिळी!

देवपाडा- वंजारपाडा प्रवासाने हाडे खिळखिळी!

कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची भयावह दुरवस्था झाली आहे.

Related Story

- Advertisement -

कर्जत तालुक्यातील नेरळ देवपाडा, वंजारपाडा ते चिंचवाडी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने त्याची भयावह दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना हाडे अक्षरशः खिळखिळी होत असल्याने प्रवाशांचे हे जीवघेणे हाल केव्हा संपणार, असा उद्विग्न सवाल विचारला जात आहे. सुमारे १० किलोमीटर अंतराचा हा रस्ता प्रशासन, तसेच लोकप्रतिनिधींकडून वाळीत टाकल्यासारखा झाल्याने त्याचे अद्याप कामच झाले नाही. खेदाची बाब म्हणजे वंजारपाडा ते चिंचवाडी दरम्यान रस्ता अत्यंत शोचनिय अवस्थेत असून, अनेक वर्षांपासून या रस्त्याचे काम झाले नसल्याचे स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परिणामी त्यांना वर्षोनुवर्षे या खडकाळ, खड्डेमय रस्त्यावरुन प्रवास करावा लागत आहे. वाहनचालकांची तर या मार्गावर कसोटी लागत असते.

देवपाडा रस्त्याची अवस्था बिकट आहे. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. या रस्त्यावर वाहन चालवणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे झोपलेल्या प्रशासनाने जागे व्हावे आणि हा रस्ता चांगल्या दर्जाचा करावा.
– अशोक तुपे, ग्रामस्थ, देवपाडा

- Advertisement -

देवपाडा-वंजारपाडा परिसरातील आदिवासी वाड्यावस्त्यांसाठी नेरळला जोडणारा रस्ता झाला, मात्र अनेक वर्षांपासूनच्या देखभाली अभावी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव उदरनिर्वाहसाठी भाजीपाला लागवड करतात. याच मार्गाने भाजीपाला विकण्यासाठी बाजारात जावे लागते. कामगारांनाही वेळेचे गणित सांभाळत या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. रिक्षा चालक तर या रस्त्यावरून वाहन नेण्यास राजी होत नाहीत. दुचाकी चालकांची तारांबळ उडत असते. अनेकदा दुचाकीस्वारांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे.

रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच समजत नाही. वाहन चालकांना या रस्त्यावर प्रवास करून पाठदुखीचा त्रास होत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी आणि चांगला रस्ता तयार करण्यात यावा.
– महेश आगे, सामाजिक कार्यकर्ता

हेही वाचा – 

- Advertisement -

महापौरांनी SRA प्रकल्पात ६ फ्लॅट बळकावले?; दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे हायकोर्टाचे आदेश

- Advertisement -