घररायगडमहाडमधील दिव्यांग प्रशांतची क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात भरारी

महाडमधील दिव्यांग प्रशांतची क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात भरारी

Subscribe

दिव्यांग हे शारीरिक असले तरी मानसिक नसावे या विचारातून आहे त्या परिस्थितिला सामोरे जाण्याची क्षमता ज्यांनी स्वीकारली त्यांनी कांही तरी वेगळं करण्याची जिद्द दाखवली आहे. अशीच जिद्द महाड मधील एका तरुणाने दाखवली आहे. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर त्याने दिव्यांगवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करून सहाय्यक प्रोफेसर पदापर्यंत मजल गाठली आहे. महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावातील प्रशांत चायाजी जाधव हा दिव्यांग तरुण इतर दिव्यांग तरुणांना आदर्शवत ठरला आहे.

 

महाड: दिव्यांग हे शारीरिक असले तरी मानसिक नसावे या विचाराने चालणार्‍या महाड तालुक्यातील प्रशांत जाधव याने आपली शैक्षणिक वाटचाल सुरूच ठेवत रोजगाराचा देखील प्रश्न सोडवला आहे. शिक्षण घेणे अद्याप सुरु असतानाच प्रशांत याने सहाय्यक प्रोफेसर पदाची नोकरी स्वीकारत रोजगाराचा देखील प्रश्न सोडवला आहे.

- Advertisement -

दिव्यांग हे शारीरिक असले तरी मानसिक नसावे या विचारातून आहे त्या परिस्थितिला सामोरे जाण्याची क्षमता ज्यांनी स्वीकारली त्यांनी कांही तरी वेगळं करण्याची जिद्द दाखवली आहे. अशीच जिद्द महाड मधील एका तरुणाने दाखवली आहे. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर त्याने दिव्यांगवर मात करत आपले शिक्षण पूर्ण करून सहाय्यक प्रोफेसर पदापर्यंत मजल गाठली आहे. महाड तालुक्यातील नांदगाव बुद्रुक गावातील प्रशांत चायाजी जाधव हा दिव्यांग तरुण इतर दिव्यांग तरुणांना आदर्शवत ठरला आहे. नांदगाव बुद्रुक येथील बौद्ध वाडीवर प्रशांत जाधव याचा जन्म झाला आहे. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी पोलिओने प्रशांतला गाठले आणि त्याच्या दोन्ही पायाला अपंगत्व आले. रांगत चालण्यापलीकडे त्याच्यापुढे पर्याय नव्हता. दोन हात जमिनीवर टेकवत गुडघ्यावर प्रशांत संपूर्ण घरात आणि परिसरात फिरत होता. त्याच्या वडिलानी म्हणजे चायाजी जाधव यांनी त्याला जवळच्या प्राथमिक मराठी शाळेत शिक्षण घेण्यास प्रवेश घेतला. पण शाळेत एकटा जाणे शक्य नसल्याने अनेकवेळा आई, वडील, भाऊ, बहिण यांनी मला खांद्यावर नेवून माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्याचे प्रशांत सांगतो. चालणेच शक्य नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र शारीरिक दिव्यांग मनावर न घेता मी काम करत होतो असे प्रशांतने सांगितले.
चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रशांतला त्याचा मोठा भाऊ चंद्रमणी याने मुंबई मध्ये नेले आणि पायावर शस्त्रक्रिया करून घेतली. या शस्त्रक्रियेमुळे रांगत चालण्यापासून सुटका मिळाली. मात्र दिव्यांग पूर्ण गेले नाही. आजही प्रशांतला दोन काठ्यांच्या आधार घेवूनच उभे राहता येते. दोन्ही काठ्यांचा आधार घेतच प्रशांत इकडे तिकडे फिरत आहे. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्या नंतर प्रशांत याचे माध्यमिक शिक्षण देखील भावाच्या घरी म्हणजे मुंबई येथे पूर्ण झाले. त्यानंतर मात्र प्रशांत याने घर गाठले. महाड मधील नांदगाव बुद्रुक गावी पुन्हा आल्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण महाड मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पूर्ण केले. विविध कलांचा बाळकडू मिळालेल्या प्रशांतला बंजो वाजवण्याबरोबरच गायनाचा देखील छंद आहे. घरातच बंजो आणि आंबेडकरी चळवळीशी संबंधित गीतांचे गायणाचा प्रभाव प्रशांत याच्यावर होता. सुगम संगीत समिती पुणे मार्फत प्रशांत याने सुगम संगीताचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. वडिलांची कडक शिस्त आणि शिक्षणाचा अट्टहास त्याला यशाच्या मार्गावर नेत गेला. अन्य भावांप्रमाणेच त्याने देखील व्यायामाचा छंद जोपासला. या घराण्याला क्रीडा क्षेत्रातील आवड असल्याचे दिसून येत आहे. प्रशांत यांची भाची देखील वजन उचलण्याच्या क्रीडा प्रकारात राज्य आणि देश पातळीवर नाव कमावत रेल्वे सारख्या विभागात सेवा बजावत आहे. तर पुतणी देखील मल्लखांब प्रकारात पारंगत असून तिने नुकत्याच गुजरात मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून काम पहिले आहे. क्रीडा क्षेत्रातील आवड आणि कौटुंबिक परंपरा यातूनच प्रशांत यांनी वजन उचलण्याच्या क्रीडा प्रकारात पारंगत होत मुंबई मधील अनेक स्पर्धेत पारितोषिके पटकावली आहेत.

आपले कष्टमय जीवन सांगताना प्रशांत याने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे आभार मानले आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच आपण काठीच्या आधार घेत दोन पायावर उभे असल्याचे सांगितले. नांदगाव बुद्रुक सारख्या छोट्याशा वाडीवर प्रशांत राहत असला तरी वाचनाच्या बळावर त्याने सामाजिक क्षेत्रात देखील झोकून दिले आहे. आपल्या बरोबरच समाजाचा देखील विकास झाला पाहिजे या उदात्त हेतून त्याने विविध सामाजिक संघटनाबरोबर काम सुरु केले आहे.

- Advertisement -

नव्या पिढीला शिक्षणदान
विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विद्यार्थी संघटनेचे महाड मध्ये एक युनिट राबवून आंदोलनात्मक भूमिका देखील घेतल्या आहेत. हे काम सुरु असतानाच त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. दहावी, बारावी, आणि पुढे पदवीधर होत पी.जी. शिक्षण सुरु आहे. प्रशांत याने बी.कॉम, तर पाली भाषेतून एम.ए. पूर्ण केले आहे. त्याने पी.एच.डी. करिता प्रवेश घेतला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत याला महाड तालुक्यातील एका बालसंस्कार या विद्यालयात सहाय्यक प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली आहे. आपल्या दिव्यांगावर मात करत प्रशांत आज नव्या पिढीला शिक्षणदान देत त्यांना घडवण्याचे काम करत आहे.

दिव्यांग हे शारीरिक आहे मात्र ते मानसिक नसावे असे मला वाटते त्यामुळे मी आलेल्या परिस्थितीला सामोरे जात कुटुंबाने दिलेले प्रेम आणि आधार यातून शिक्षण घेत गेलो. माझ्यासारख्या असंख्य दिव्यांग बांधवानी देखील शासनाची आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
– प्रशांत जाधव, महाड

प्रशांत जाधव या दिव्यांग तरुणाने शिक्षणात घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. त्याच्यासारखे तरुण आमच्या महाविद्यालयाला लाभणे आम्ही आमचे भाग्य समजतो. त्यांच्या विविध कलागुणांनी आमच्या येथील विद्यार्थी नक्कीच घडतील अशी आशा आहे
– अनिल सकपाळ,

संचालक, बालसंस्कार विद्यालय, कोकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -