Maharashtra Assembly Election 2024
घररायगडडॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे रौप्य क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे रौप्य क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

Subscribe

देशविदेशातील विद्यार्थ्यांना विद्यादानाचे मदतकार्य तंत्रशास्त्राच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ करीत आहे. राज्यातील तंत्रशास्त्राचे एकमेव विद्यापीठ म्हणून या विद्यापीठाचा उल्लेख करावा लागेल. अत्यंत निसर्गरम्य अशा परिसरात या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली असून रायगड जिल्ह्याच्या शैक्षणिक वैभवात या विद्यापीठामुळे निश्चितच मोठी भर पडलेली आहे.

माणगाव-: महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालया मार्फत आयोजित २५ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव-२०२३ अर्थात रौप्य महोत्सवी क्रीडा स्पर्धेचे आयोजन ३ ते ७ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले आहे. या क्रीडा स्पर्धेचा शनिवार ३ फेब्रुवारी रोजी शानदार शुभारंभ रायगड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या भव्य पटांगणात करण्यात आला. ( Silver Sports Festival at Dr. Babasaheb Ambedkar Technical University, Lonere)या महोत्सवात कबड्डी, खो-खो, फुटबॉल, आणि बुध्दिबळ या खेळांचा सामावेश होणार आहे. महाराष्ट्रातील २३ विद्यापीठांतील अंदाजे २००० विद्यार्थी ५०० संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सव-२०२३ चे उद्घाटन आ. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अर्जुन पुरस्कार विजेती, भारतीय खो-खो कर्णधार सारिका काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत सहभागी झालेल्या २३ विद्यापीठांच्या स्पर्धकांनी उपस्थितीत मान्यवरांना मानवंदना दिली. अर्जुन पुरस्कार विजेती, भारतीय खो-खो कर्णधार सारिका काळे, आमदार भरत गोगावले व शरद बनसोडे यांनी क्रिडा ज्योत पेटवून क्रीडा स्पर्धेला सुरुवात केली.

या कार्यक्रमा प्रसंगी मान्यवरां समवेत कुलगुरू कारभारी काळे, मुख्य क्रिडा समन्वयक शिवाजी कराड, कुल सचिव अरविंद कुवळेकर, डॉ.मनोज रूढी, ओमकार अंबपकर, अधिष्ठाता एस.एल.नलबरे, पोरे सर, विठ्ठल नाईक, दयानंद कांबळे, प्रमोद घोसळकर उपस्थित होते.

- Advertisement -

राज्यपाल कार्यालय, राजभवन यांनी नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीच्या मार्गदर्शनाखाली तसेच विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे व कुलसचिव डॉ.अरविंद किवळेकर, मुख्य क्रिडा समन्वयक प्रा.डॉ.शिवाजी कराड यांच्या निर्देशानुसार या क्रीडा महोत्सवाच्या अनुषंगाने आवश्यक असण्यार्‍या सोयी सुविधा पुरविण्याची मोठया प्रमाणात तयारी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -