घररायगडमहाड तालुक्यात ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी अंतिम टप्प्यात

महाड तालुक्यात ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी अंतिम टप्प्यात

Subscribe

महाराष्ट्रात टोपो पद्धतीने केली गेलेली जमीन मोजणी आजही अस्तित्वात आहे. मात्र सातत्याने ग्रामीण भागात वाढत असलेली लोकसंख्या आणि विकास योजनांमुळे भौगोलिक बदल होत आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन पद्धतीने जमीन मोजणी करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागाकडून ड्रोनद्वारे केली जाणारी जमीन मोजणी महाड तालुक्यात अंतिम टप्प्यात आहे. या मोजणीमुळे ग्रामस्थांना त्यांच्या मिळकतीवर मिळकत प्रमाणपत्र मिळणार आहे.

महाराष्ट्रात टोपो पद्धतीने केली गेलेली जमीन मोजणी आजही अस्तित्वात आहे. मात्र सातत्याने ग्रामीण भागात वाढत असलेली लोकसंख्या आणि विकास योजनांमुळे भौगोलिक बदल होत आहेत. यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन पद्धतीने जमीन मोजणी करण्याचा निर्णय घेतला. या ड्रोनद्वारे गावठाणातील मालमत्तेचे जी.आय.एस. आधारित रेखांकन व मुल्यांकन केले जात आहे. या मोजणीमुळे गावठाणाचे अभिलेख निश्चित केले जात असून संपूर्ण राज्यात अशा पद्धतीने मोजणी सुरु आहे. महाड तालुक्यात १७७ गावांची ड्रोनद्वारे मोजणी केली जात आहे. तालुक्यात २६ एप्रिलपर्यंत १३० गावे आणि १०३ वाड्यांमधील जमिनींची मोजणी केली असल्याची माहिती तालुका भूमिअभिलेख अधिकारी चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

या ड्रोन मोजणीमुळे गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार केला जाणार आहे. प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला, यांना नगर मापक क्रमांक दिला जाणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार गावठाणामधील प्रत्येक मिळकतीचे मिळकत प्रमाणपत्र तयार केले जाणार आहे. जमीन मोजणी आता अंतिम टप्प्यात असून तालुक्यातील नागरिकांना या मोजणीचा फायदा होणार आहे.

ग्रामीण भाग आणि शहरात वाढणारी लोकसंख्या यामुळे होणारा विकास आणि भौगोलिक बदल यामुळे ड्रोनद्वारे जमीन मोजणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. महाड तालुक्यात ही मोजणी अंतिम टप्प्यात आली आहे.
– पांडुरंग चौधरी, तालुका भूमीलेख अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -