घर रायगड रायगड जिल्ह्याच्या राजधानीचं नामांतर ‘मायनाक नगरी’ करा - नविनचंद्र बांदिवडेकर

रायगड जिल्ह्याच्या राजधानीचं नामांतर ‘मायनाक नगरी’ करा – नविनचंद्र बांदिवडेकर

Subscribe
अलिबाग: मायनाक भंडारी यांच्या खांदेरी किल्ल्यावरील पराक्रमाचा व त्यांच्या शौर्याचा खरा इतिहास लपवला गेला आहे.हि आपल्या भंडारी समाजाची घोर चेष्ठा आहे.तो मायनाक भंडारी यांचा त्याच प्रमाणे स्वाभाविकच भंडारी समाजाचा अपमान आहे.हा लपवला गेलेला इतिहास आपल्या सर्वांच्या सहकाराने कसा उघड होईल,त्याची दुरुस्ती कशी होईल या करीता आपले सर्वांचेच प्रयत्न आहेत. आरमार प्रमुख मायनाक भंडारी दौलत खान यांनी खांदेरी किल्ला उभारतांना त्यांनी केलेल्या शौऱ्याचा व पराक्रमाचा अभूतपूर्व इतिहासात नोंद आहे,१९ सप्टेंबर १६७९ पर्यंत आरामाराचा शेकडो वर्ष अनुभव असलेले इंग्रज हे सागरी युद्धात अपराजित होते.
ज्या मायनाक भंडारींनी शौर्य गाजविला त्याच बेटाला कान्होजी आंग्रे यांचं नाव दिलं आहे,ते राहूदे तसंच आम्हाला वाद सुध्दा घालायचं नाही.अलिबाग हि रायगड जिल्ह्याची राजधानी आहे.त्या अलिबागचं नामांतरण मायनाक नगरी झालं पाहिजे हा आमचा हट्ट आहे अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,कोकण रत्न पुरस्कार प्राप्त नवीनचंद्र बांदिवडेकर यांनी केली आहे.
अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष,कोकण रत्न पुरस्कार प्राप्त नवीनचंद्र बांदिवडेकर  यांच्या अध्यक्षतेखाली,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आरमारातील पहिले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे वारस मिनेश मायनाक यांच्या मालकीच्या मेघा टॉकीज अलिबाग येथील सभागृहात महासंघाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सदर मागणीचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांना देण्यात आले.या वेळी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर,कार्याध्यक्ष विनोद चव्हाण,खजिनदार जगदीश आडिवरेकर,उद्योजक प्रफुल्ल मोरे,भाऊ घुमकर,भंडारी समाज मुरुड तालुका अध्यक्ष विजय तथा बाबू सुर्वे,रायगड संपर्क प्रमुख सुधाकर पाटील,रा.जि.महिला सं.प्र.विजया कुडव,विश्वस्त रिटा मिठबावकर,पदाधिकारी महासंघ शलाका पांजरी,शरद पांजरी,श्रीवर्धन कसबा पेठ भंडारी समाज अध्यक्ष बाबू खापणकर,मिनेश शिवलकर,रेवदंडा-चौल भंडारी समाज हितवर्धक मंडळाचे उपाध्यक्ष प्रशांत जाधव,सदस्य संदीप खोत,अलिबाग ता.प्रमुख सुरेश खडपे,गणेश गुळेकर,सुहास पोलेकर यांच्या सह जेष्ठ-श्रेष्ठ समाज बांधव यावेळी उपस्थित होते.यावेळी निवेदनाची एक प्रत अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांची भेट घेऊन त्यांनाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन खजिनदार जगदीश आडीवरेकर यांनी केले, पाहुण्यांचे स्वागत रा.जि.महिला संपर्क प्रमुख कुडव यांनी केले. यावेळी भाऊ घुमकर, विजय तथा बाबू सुर्वे, सं.प्र.सुधाकर पाटील, कार्यध्यक्ष विनोद चव्हाण यांनी आपले बहुमोल असे विचार मांडले शेवटी जगदीश आडीवरेकर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले.
सन्मान करण्यात यावा
रायगड मधील खांदेरी बेटाचे सरखेल कान्होजी आंग्रे बेट नामांतर झाले,हा मायनाकांचा अपमान केला आहे.आम्हाला त्याचा मोबदला पाहिजे.आम्हांला बदला घ्यायचा नाही.आम्हांला मोबदला काय हवाय, तर छत्रपती शिवरायांच्या काळातील पहिले आरमार प्रमुख आणि अपराजित योद्धा आहेत आणि म्हणून ब्रिटिश आरमाराचा पहिला पराभव करणा-या जगज्जेता ॲडमिरल मायनाक भंडारी यांचे नाव अलिबाग शहराला देऊन त्यांचा उचीत सन्मान करण्यात यावा.अशी मागणी अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी सभेला केली
पनवेलला इंटरनॅशनल एअर पोर्ट होतंय त्याला दि.बा.पाटील यांचे नाव दिलं आहे. ते आगरी समाजाचे नेते होते, लढवय्ये होते. लोक नेते होते. मग मायनाक भंडारी यांनी स्वराज्यासाठी कमी काम केलंय का ? भागोजी कीर यांनी कमी काम केलंय का? रत्नागिरीच्या प्रवेश द्वाराला भागोजी कीर यांचं नाव दिलं आहे. तो लढा सुध्दा आम्हीच दिलाय,आणि हा आमचा दुसरा लढा आहे. हा आमच्या अस्मितेचा लढा आहे. उद्या जरी जेल मध्ये जाण्याची वेळ आली तरी आम्ही जेल मध्ये जाण्यास आमची  तयारी आहे. मायनाक भंडारी हि आमची अस्मिता आहे.
– नवीनचंद्र बांदिवडेकर,
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -