घररायगडअवकाळी पावसामुळे आंबा, कांदा, वालपिक धोक्यात

अवकाळी पावसामुळे आंबा, कांदा, वालपिक धोक्यात

Subscribe

मुरूड तालुक्यात मंगळवारी सकाळी पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोहोरलेले आंबा, पिक, कांदा,वाल आदी. कडधान्य पिकाला मोठा धोका पोहोचल्याने शेतकरी-बागायतदार अक्षरश: धास्तावले आहेत. यंदा बहुतेक सर्व पिके बहरली होती. निसर्गाच्या तांडवामुळे पिके नेस्तनाबुत होतील की काय? अशी भिती व्यक्त होत आहे.

नांदगाव: मुरूड तालुक्यात मंगळवारी सकाळी पडलेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोहोरलेले आंबा, पिक, कांदा,वाल आदी. कडधान्य पिकाला मोठा धोका पोहोचल्याने शेतकरी-बागायतदार अक्षरश: धास्तावले आहेत. यंदा बहुतेक सर्व पिके बहरली होती. निसर्गाच्या तांडवामुळे पिके नेस्तनाबुत होतील की काय? अशी भिती व्यक्त होत आहे.
मंगळवारी सकाळी तालुक्यात साळाव पासून बोर्ली- मांडला, कोर्लई, काकलघर, सुरई,बारशिव, काशिद, सुपेगाव, तळेखार पट्ट्यात मुसळधार पावसाने वादळी वार्‍यासह हजेरी लावली तर काही ठिकाणी जोरदार बरसाला, या पावसामुळे वीटभट्टी, कलिंगड, फळ-भाजीपाला पिकाला धोका पोहोचल्याचे समजते. तसेच या विचित्र अवकाळी हवामानाचा परिणाम मासेमारीवर झाला असून मासेमारी ठप्प झाली आहे. तालुक्यात अजूनही वीटभट्टी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. यासाठी बँकेतून काही जणांनी कर्ज काढलेले आहे. या व्यावसायिकांना अवकाळीमुळे नुकसानीला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

समुद्रात मासेमारीवर परिणाम
याबाबत राजपूरी येथील ज्येष्ठ मच्छिमार धनंजय गिदी यांनी सांगितले की, या विचित्र हवामानाचा मुरुड परिसरातील समुद्रात मासेमारीवर परिणाम झालाआहे.दुपारी मुरूड समुद्रकिनारी देखील विजेचा गडगडाट होत होता.वातावरण ढगाळ होते. ऐन होळी सणाच्या वेळी ’जवळा’ सारखी छोटी मासळी यंदा मिळाली नाही.त्यामुळे मच्छीमारांना होळी सण जेमतेमच साजरा करावा लागला. सध्या ढगाळ वातावरणामुळे छोटी मासळी मिळण्याची शक्यता दुरावली आहे. एखादं दुसरी नौका मासेमारीस जाताना दिसत असते.वादळी हवामाना मुळे मच्चीमारिस पुन्हा ब्रेक लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.त्यामुळे मच्छीमार अडचणीत आले आहेत.अवकाळी पावसाने शेतकरी, बागायतदार देखील धास्तावले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -