डंपरची एसटी बसला धडक; महाडनजीकच्या अपघातात २४ प्रवासी जखमी

मुंबई - गोवा महामार्गावर शहरा नजीक नातेखिंड जवळ मुंबई महाबळेश्वर एसटी बस आणि एका डंपरमध्ये सामोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एसटी बस चालक आणि डंपर चालकासह अन्य २२ प्रवासी असे एकूण २४ जण जखमी झाले. मुंबई आगारातून सकाळी ४.४५ वाजता सुटणारी मुंबई महाबळेश्वर बस (एमएच १४/बीटी३०८२) ही महाडनजीक नाते खिंड या ठिकाणी ९.४५ वाजता आली असता समोरून येणार्‍या मुंबई दिशेला जाणार्‍या एका डंपर (एमएच०६/बीव्ही ५२००) यावर विरुद्ध दिशेला जाऊन आपटली. अपघात एवढा भीषण होता की एसटीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्य भागी अडकून पडली.

महाड : मुंबई – गोवा महामार्गावर शहरा नजीक नातेखिंड जवळ मुंबई महाबळेश्वर एसटी बस आणि एका डंपरमध्ये सामोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एसटी बस चालक आणि डंपर चालकासह अन्य २२ प्रवासी असे एकूण २४ जण जखमी झाले. मुंबई आगारातून सकाळी ४.४५ वाजता सुटणारी मुंबई महाबळेश्वर बस (एमएच १४/बीटी३०८२) ही महाडनजीक नाते खिंड या ठिकाणी ९.४५ वाजता आली असता समोरून येणार्‍या मुंबई दिशेला जाणार्‍या एका डंपर (एमएच०६/बीव्ही ५२००) यावर विरुद्ध दिशेला जाऊन आपटली. अपघात एवढा भीषण होता की एसटीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही वाहने महामार्गाच्या मध्य भागी अडकून पडली.
या अपघातामध्ये सिद्धार्थ राजेंद्र जंगम (एसटी चालक, ३१,बांधन अलिबाग) , उमेश दत्तात्रय शिंगटे (३५,सळवल सातारा), अजित बाळ पाटील (५१पेण), विमल महेश शिगवण (४०, तळेगाव माणगाव), कलंदर जरुद्दीन कुवारे, ३८ नागोठणे), शांती दगडू भोसले (७०देवळी माणगाव), उमेश बळीराम खैर (४२, कोलाड), सुनील सुदाम रसाळ (५१,सापे महाड), नमिता गोविंद वाघमारे (६०, तळेगाव माणगाव), कविता नरेश मानंद (३८, देवळी माणगाव), सविता आदेश भोसले (३१, देवळी माणगाव), लतिका लक्ष्मण शिंदे (४५.छत्री निजामपूर महाड), अलमास असीम कुवारे (३६नागोठणे), अफोज अजीज कुवारे (३६,नागोठणे), अब्दुल रहेमान आसिफ कुवारे (७ नागोठणे), सविता सखाराम शिर्के (५०,चिंचवली माणगाव), महमद शहा अब्दुल अजीज कुवारे (१०,नागोठणे), मरियम अब्दुल अजीज कुवारे (१२, नागोठणे), फातिमा आसिफ कुवारे (३ नागोठणे), भारती लक्ष्मण हिरवे (१७,रानसई पेण), दीपाली लक्ष्मण हिरवे (२०,रानसई), शर्वरी अनंत कासार (२०, मुंबई गोरेगाव), आप्पा पोपट चव्हाण, ३४ ,बरड सातारा) असे २४ प्रवासी जखमी झाले.

महामार्गावरील वाहतूक सुरळीत
अपघात झाला त्या वेळी एसटीमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघाताची खबर मिळताच येथीळ महामार्ग वाहतूक शाखा आणि शहर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत तातडीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करत क्रेनच्या सहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.