घररायगडमहाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची निवडणूक बिनविरोध

Subscribe

महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला १२ जागा तर शिंदे गटाला अवघ्या ३ जागा देण्यात आल्या असून निवडणूक बिनविरोध झाली आहे.

महाड: महाड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणुकी मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीला १२ जागा तर शिंदे गटाला अवघ्या ३ जागा देण्यात आल्या असून निवडणूक बिनविरोध झाली आहे.
काँग्रेसचे रायगड जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष नानासाहेब जगताप यांच्यासह, तालुका अध्यक्ष राजुशेठ कोरपे, चेअरमन बंडूशेठ देशमुख, महेश महाडीक, अनिल बेल, संदेश गोठलं, धोंडीराम डोंबे, आत्माराम लाड, शंकर महाडीक, आर.एन. देशमुख, नथुराम धामणे, सौ.भोसले हे संचालक बिनविरोध निवडणून आले. यावेळी त्यांचे अभिनंदन करताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्रीधर सकपाळ, जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष धनंजय देशमुख, जगदीश पवार, प्रीती कालगुडे, सरपंच मुबिना ढोकले, निसारभाई ढोकले, विनोद भोसले, प्रशांत कालगुडे, रोहित पोरे, भुपेश पाटील, महेश शेडगे, किसन पवार, वेदांत मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -