घररायगडपावसाळापूर्व दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन, वारंवार वीज पुरवठा खंडित

पावसाळापूर्व दुरुस्तीच्या नावाखाली भारनियमन, वारंवार वीज पुरवठा खंडित

Subscribe

दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यात उन्हाळ्यात विजेचे खांब, लाईल, रोहित्र दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावे लागते. त्यामुळे मान्सूनमध्ये येणार्‍या वादळांमध्ये मोठा बिघाड टाळता येतो. मागील दोन वर्षाच्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी दुरुस्तीची कामे लवकर घ्यावी लागली आहेत.

रायगड जिल्ह्यात एकाही तालुक्यात अधिकृत वीज भारनियमन नाही. परंतु पावसाळ्यापुर्वीच्या दुरुस्तीसाठी
केव्हाही वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. त्याचबरोबर उन्हाळ्यातील वाढत्या वीज वापरामुळे इमर्जन्सी भारनियमन करण्याच्या घटना सातत्याने वाढत आहेत. खंडीत झालेली वीज केव्हा परत येईल याचे कोणतेही वेळापत्रक वीज वितरण कंपनीने दिलेले नसल्याने येथील नागरिक उकाड्याने हैरान झाले आहेत.. भविष्यात दुरुस्ती आणि विजेच्या जास्त वापरामुळे भारनियमाला सामोरे जावे लागेल, असे संकेत महापारेषणने दिलेले असल्याने भर उन्हाळ्यात रायगडकरांना वीज भारनियमनला सामोरे जावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात वीजपुरवठा खंडीत होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्यात उन्हाळ्यात विजेचे खांब, लाईल, रोहित्र दुरुस्तीचे काम मोठ्या प्रमाणात हाती घ्यावे लागते. त्यामुळे मान्सूनमध्ये येणार्‍या वादळांमध्ये मोठा बिघाड टाळता येतो. मागील दोन वर्षाच्या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी दुरुस्तीची कामे लवकर घ्यावी लागली आहेत. मात्र, या दुरुस्तीच्या कारणासाठी मागील काही दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण देताना भांडूप येथील महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयाने सांगितले की, हे अधिकृत भारनियमन नसून वीजेच्या अतिरिक्त वापरामुळे इमर्जन्सी भारनियमन आहे. सायंकाळच्या वेळी विजेचा वापर वाढत असल्याने महाड, रोहा, खोपोली या सारख्या औद्योगिक वसाहती असलेल्या ठिकाणी नागरी भागातील वीज खंडीत होते. पावसाळापूर्व दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतल्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ठराविक वार देण्यात आलेला आहे. या दिवशी सकाळपासूनच वीज खंडीत केली जाते. खंडीत झालेली गेलेली वीज केव्हा येईल याचे कोणतेही वेळापत्रक वीज वितरण कंपनीने दिलेले नाही.

- Advertisement -

तळा तालुक्यात भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. मात्र, या ठिकाणी कधीकधी दिवसभर वीज गायब झालेली असते. तर पेण तालुक्यात तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा खंडीत झालेला असतो. बुधवारी दुरुस्ती कामानिमित्त सकाळपासून संध्याकाळी ५.३० पर्यंत वीज नव्हती. खोपोली, खालापूर, श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यात अधिकृत भारनियमन नसले तरी येथे वीज खंडीत होण्याचा कालावधी वाढू लागला आहे.

पावसाळ्यात वीज पुरवठा खंडीत होऊ नये नये यासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्यावी लागणार आहेत. त्याचबरोबर ज्या भागात विजेचा वापर वाढेल त्या ठिकाणी अचानक वीज खंडीत करावी लागेल. नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्याचा प्रयत्न महावितरणकडून घेतला जात आहे.
– ममता पांडे, जनसंपर्क अधिकारी, महावितरण क्षेत्रीय कार्यालय भांडूप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -