Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर रायगड शेळ्या-मेंढ्यांचा अपहार; गोशाळा रडारवर

शेळ्या-मेंढ्यांचा अपहार; गोशाळा रडारवर

पोलिसांच्या ताब्यातील बोकड गायब प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर वेगळेच सत्य बाहेर येत असून, सुरक्षिततेसह संगोपनाची जबाबदारी दिलेल्या गोशाळेतून शेळ्या-मेंढ्यांचा अपहार झाल्याचे येथील पोलिसांनी स्पष्ट केल्यामुळे गोशाळा रडारवर आल्या आहेत.

Related Story

- Advertisement -

पोलिसांच्या ताब्यातील बोकड गायब प्रकरणाचा गवगवा झाल्यानंतर वेगळेच सत्य बाहेर येत असून, सुरक्षिततेसह संगोपनाची जबाबदारी दिलेल्या गोशाळेतून शेळ्या-मेंढ्यांचा अपहार झाल्याचे येथील पोलिसांनी स्पष्ट केल्यामुळे गोशाळा रडारवर आल्या आहेत. प्राणी संरक्षक अधिनियमानुसार पशुधनाची वाहतूक करताना आवश्यक ती खबरदारी, तसेच कायदेशीर परवानगीची पूर्तता करणे आवश्यक असते. परंतु ट्रक आणि टेम्पोतून दररोज शेकडो पशुंची वाहतूक नियमाला हरताळ फासून होते. असाच ट्रक खालापूर टोल नाक्यावर प्राणी मित्र म्हणविणार्‍यांनी अडवला होता. परंतु पोलिसांना माहिती न देता कायदा हातात घेऊन चालकाला दमदाटी करण्याचा अधिकार नसल्याने ट्रक चालकाने प्राणी मित्रांविरोधात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोणतेही वाहन अडविण्याचे अधिकार प्राणी मित्रांना नाहीत. निर्दयीपणे पशुधनाची वाहतूक होत असेल तर पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे. वाहन अडवून नंतर पोलिसांना सांगणे गुन्हा आहे. असे एखादे रॅकेट असेल तर पोलीस कारवाईचा बडगा उचलतील.
– अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, खालापूर

- Advertisement -

तर याच प्रकरणात शेळ्या-मेंढ्या कोंबून वाहतूक केली म्हणून ट्रकसह चालकाला ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर घडलेल्या घटनेमुळे प्राणी मित्र संघटनेच्या नावाखाली एखादे लुटारू रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. जप्त केलेल्या शेळ्या-मेंढ्या नियमानुसार शासकीय मान्यता असलेल्या गोशाळेत पाठविण्याचे काम पोलिसांनी पार पाडले. परंतु ज्यावेळी त्या गोशाळेतून नेण्यासाठी आलेल्या मालकाला ८३ मेंढ्या आणि १०३ शेळ्या कमी असल्याचे आढळल्यावर धक्का बसला. रायगड पोलीस अधीक्षकांपर्यंत प्रकरण गेल्यानंतर गोशाळा चालक चेतन शर्मा आणि रणजित खंडागळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रामाणिक काम करणार्‍या प्राणी मित्र संघटना यामुळे अडचणीत येतात. कायदा हातात घेणे चुकीचे आहे. पोलिसांचे सहकार्य घेऊन बेकायदेशीर वाहतूक कारवाई करणे उचित आहे.
– सुनील गायकवाड, प्राणीमित्र, लोणावळा

- Advertisement -

महामार्गावरून पशुधनाच्या होणार्‍या वाहतुकीवर पाळत ठेवणारे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. अनेकदा स्वतःला प्राणी मित्र म्हणवणारे पोलिसांच्या नकळत वाहन अडवून चालकाला दमदाटी करून पैसे उकळतात आणि तडजोड झालीच नाही तर पोलिसांना कळवले जाते. त्यानंतर पुढील कारवाईपर्यंत पशुधन गोशाळेकडे सोपविले जाते. रॅकेटचे काही गोशाळांशी कनेक्शन असल्याची शक्यता असून, पोलीस आणि न्यायालयीन फेर्‍यातून पशुधन नेण्याचे मालक टाळतात. त्यामुळे रॅकेटचे आयतेच फावते.

 हेही वाचा –

अजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या असल्या म्हणून काय झाले ?, नाना पटोले आक्रमक

- Advertisement -