घररायगडपनवेलमध्ये गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर

पनवेलमध्ये गोवर प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर

Subscribe

महापालिका क्षेत्रातून येत असलेल्या गोवर रूबेला रूग्णांची संख्या लक्षात घेऊन महापालिका मुख्यालयात गुरुवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक घेण्यात आली.

पनेवल: महापालिका क्षेत्रातून येत असलेल्या गोवर रूबेला रूग्णांची संख्या लक्षात घेऊन महापालिका मुख्यालयात गुरुवारी आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका कार्यक्षेत्रातील बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग तज्ज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, गोवरचे रूग्ण मिळालेल्या परिसराचा सर्वे करणे, तसेच जनजागृती व लसीकरणावर भर देण्याच्या सूचना आयुक्तांनी वैद्यकिय अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी उपायुक्त सचिन पवार, प्रभारी मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. रेहाना मुजावर जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष समन्वयक अरूण काटकर, डॉ. अभय सेठी, डॉ. जॉय भांडारकर, डॉ. राहूल पेद्दावाड, डॉ. र्कितीक करे, डॉ. मंदार बद्रापूरकर, डॉ.विवेक गुप्ता, डॉ. स्वाती लिकीते, डॉ. तुषार जाधव, डॉ. विनय कमले, डॉ. प्रशांत गायकवाड, लसीकरण क्षेत्र सहनियंत्रक मोहन मुकादम, महापलिकेच्या सहा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी तसेच एएनएम,जीएनम, आशा वर्कर उपस्थित होत्या.

दर बुधवारी याठिकाणी गोवरची लस
आतापर्यंत महापालिका क्षेत्रात ५ रूग्ण आढळले असून १३ रूग्ण संशयित आहेत. यांच्या रक्तांचे नमुने तपासणीस पाठविले आहेत. गोवर रोग हा संसर्गजन्य रोग असला तरी ज्यांनी याचे डोस घेतले आहेत, त्यांच्यामध्ये याची तीव्रता कमी दिसते. त्यामुळे अजूनही ज्या मुलांचे गोवरचे डोस राहीले आहेत त्यांच्या पालकांनी आपल्या जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जावे. दर बुधवारी याठिकाणी गोवरची लस दिली जाते. याशिवाय आपल्या कार्यक्षेत्रात ३०० ठिकाणी बाह्यलसीकरण सत्रे घेतली जातात. या लसीकरण सत्रांमध्ये देखील गोवरचा डोस दिला जातो.

- Advertisement -

राखीव रूग्णवाहिकेची सोय
घरामध्ये एखादा गोवर रूग्ण आल्यास त्यास सात दिवस आयसोलेशनमध्ये ठेवावे जेणे करून याचे इन्फेक्शन दुसर्‍यांना होणार नाही याची नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गरज भासल्यास त्या त्या परिसरातील बालरोग तज्ज्ञाची मदत घेण्याविषयी वैद्यकिय अधिकार्‍यांना यावेळी सूचित करण्यात आले. तसेच गोवरसाठी महापालिकेच्या वतीने गोवरसाठी खास एक रूग्णवाहिका राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील गंभीर गोवरचे रूग्ण आढळल्यास त्यांनी मोफत रूग्णवाहिकेसाठी महापालिकेशी संपर्क करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे.

———————-

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -