घररायगडमाथेरानमध्ये घोड्यांचे डोळे तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

माथेरानमध्ये घोड्यांचे डोळे तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Subscribe

येथील पर्यटनातील अविभाज्य भाग म्हणुन दळवळणाचे प्रमुख साधन म्हणून गणले जाणारे घोडे यांच्या आरोग्याच्या दृष्टीने माथेरानच्या माउंट मैदानावर बुधवारी करण सांघवी आणि द आय व्हेट यांच्या संयुक्त विद्यमाने घोडे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जगप्रसिद्ध घोडे नेत्रचिकिस्तक डॉ. रिचर्ड जे. मॅकम्युलेन यांच्यासह द आय व्हेटचे संस्थापक डॉ. कस्तुरी भडसावळे आणि त्यांच्या टीमने परिसरातील घोड्यांची नेत्र तपासणी केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

माथेरान  येथील पर्यटनातील अविभाज्य भाग म्हणुन दळवळणाचे प्रमुख साधन म्हणून गणले जाणारे घोडे यांच्या आरोग्याच्या दृष्टीने माथेरानच्या माउंट मैदानावर बुधवारी करण सांघवी आणि द आय व्हेट यांच्या संयुक्त विद्यमाने घोडे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जगप्रसिद्ध घोडे नेत्रचिकिस्तक डॉ. रिचर्ड जे. मॅकम्युलेन यांच्यासह द आय व्हेटचे संस्थापक डॉ. कस्तुरी भडसावळे आणि त्यांच्या टीमने परिसरातील घोड्यांची नेत्र तपासणी केली. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी सुमारे ६० हून आधिक घोड्यांची नेत्रतपासणी करण्यात आली.यावेळी बहुतेक घोड्यांना अ‍ॅलर्जीमुळे डोळ्यांच्या आजाराने त्रास होत असल्याचे आढळून आले. प्राथमिक तपासणी उपक्रमाचा विस्तार करून, दहा घोड्यांवर ’इंट्रावीट्रिअल जेंटामिसिन’ प्रक्रिया करण्यात आली, तसेच एका घोड्यावर ’गंडरसन कनजंक्टीवाईटल फ्लॅप’ ही शस्त्रक्रिया केली गेली आणि तीन घोड्यांना तातडीने उपचाराची गरज असल्याने ’फोटो डायनॅमिक लेझर थेरपी’ देण्यात आली.
‘द आय व्हेट’ भारतातील पहिले आणि एकमेव विशेष पशुवैद्यकीय नेत्रचिकित्सा क्लिनिक आहे. जे सल्लामसलत, निदान चाचण्या, प्रगत नेत्ररोग शस्त्रक्रियांसह प्राण्यांसाठी संपूर्ण डोळ्यांची काळजी प्रदान करते. भारतातील अग्रगण्य पशुवैद्यकीय नेत्रतज्ज्ञ डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी २०१८ मध्ये ‘द आय व्हेट’ ची स्थापना केली. डॉ. कस्तुरी या मुंबईतील पशुवैद्यकीय पदवीधर आहेत.डॉ. कस्तुरी भडसावळे यांनी ऑस्ट्रेलियात स्वतःची नेत्रचिकित्सा सल्लामसलत सुरू केली. पण त्यांना स्वदेशाबद्दल नेहमीच तीव्र आकर्षण होते आणि त्यांना त्यांचे कौशल्य भारतातील पाळीव प्राण्यांच्या मालकांना देऊन करायचे होते, म्हणून त्या भारतात परतल्या. ’द आय व्हेट’ मुंबई आणि पुणे येथे कार्यरत आहे आणि आठवड्यातून ६ दिवस खुले असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -