घररायगडसरकार बनवण्याचा मताचा अधिकार ईव्हीएमने हिरावून घेतला; वामन मेश्राम यांचे प्रतिपादन

सरकार बनवण्याचा मताचा अधिकार ईव्हीएमने हिरावून घेतला; वामन मेश्राम यांचे प्रतिपादन

Subscribe

देशात ईव्हीएमच्या माध्यमातून मिलीजुली सरकारचा खेळ सुरु असल्याने लोकांच्या मताच्या अधिकारातून सरकार बनत नसून ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत असल्याने ईव्हीएमच्या विरोधात बामसेफ जनआंदोलन उभे करून भारत बंद केला जाईल असा इशारा बामसेफचे वामन मेश्राम यांनी दिला आहे.

महाड: देशात ईव्हीएमच्या माध्यमातून मिलीजुली सरकारचा खेळ सुरु असल्याने लोकांच्या मताच्या अधिकारातून सरकार बनत नसून ते ईव्हीएमच्या माध्यमातून होत असल्याने ईव्हीएमच्या विरोधात बामसेफ जनआंदोलन उभे करून भारत बंद केला जाईल असा इशारा बामसेफचे वामन मेश्राम यांनी दिला आहे.
बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी नुकतीच महाडमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी भेटीचा हेतू स्पष्ट करताना ईव्हीएम विरोधात भांडाफोड परिवर्तन यात्रा आंध्रप्रदेश पर्यंत काढली होती मात्र कोविडमुळे ही परिवर्तन यात्रा रद्द केली होती. त्यानंतर कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत दुसरी परिवर्तन यात्रा काढण्यात आली मात्र ती देखील पोलीस परवानगीसाठी थांबवण्यात आली. त्यामुळे यापुढे ईव्हीएम विरोधात जनजागृती करण्यासाठी ६७४ जिल्ह्यात रॅली काढण्यात येत असल्याचे सांगितले.

मताच्या अधिकारासाठी लढा सुरू

- Advertisement -

ईव्हीएम मशीनद्वारे घोटाळा करून काँग्रेस आणि भाजप सत्तेचा खेळ खेळत आहे असा देखील आरोप केला. या ईव्हीएम मशीनच्या विरोधात बामसेफ जनजागृती करून देशातील जवळपास दहा हजार संघटना एकत्रित करून भारत बंद करेल असा इशारा देखील दिला. मतदारांना सरकार बनवण्याचा अधिकार होता, आपल्या हक्काचा आमदार बनवण्याचा अधिकार होता, मात्र तो हक्क ईव्हीएम मशीनने हिराहून घेतला आहे. ईव्हीएम मशीनच सरकार बनवत असल्याचे सांगून घटनेने दिलेल्या मताच्या अधिकारासाठी आमचा लढा सुरू असल्याचे देखील वामन मेश्राम यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत नथुराम हाटे, सुभाष मोहिते, अशोक सकपाळ, अब्दल्ला देशमुख, अमीर डांगे, रमेश पवार, संजीवन तांबे, रफिक लंबाडे, नाना अंबावले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पेपर टेल मशीनची मोजणी व्हावी
ईव्हीएममुळे देशात फ्री फेअर अँड ट्रान्सपरंट निवडणूक होऊ शकत नाही असे सुप्रीम कोर्टाने आठ ऑक्टोबर २०१३ रोजी निर्णय दिला होता. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टामध्ये निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केली नाही याकरिता कंटेंट ऑफ कोर्ट दाखल केला होता, त्यानुसार २०१९ च्या निवडणुकीमध्ये पेपर टेल मशीन लावण्यात यावी असा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर पेपर टेल मशीनची मोजणी देखील केली पाहिजे असे सांगितले होते मात्र आजतागायत पेपरटेल मशीन ची मोजणी झालेली नाही असा आरोप वामन मेश्राम यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -