घररायगडमुख्यमंत्र्यांनी केलेल्या बंगल्याचा घोटाळा एका महिन्यात उघड करणार-किरीट सोमय्या

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बंगल्याचा घोटाळा एका महिन्यात उघड करणार-किरीट सोमय्या

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या बंगल्याचा घोटाळा एका महिन्याच्या आत उघड करून जनतेसमोर आणणार असल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली. मुरुड तालुक्यातील कोलई ग्रामपंचायत हद्दीतील मालमत्ता ठाकरे यांच्या मालमत्ता संदर्भातील माहितीसाठी ते मुरुड तहसील कार्यलायत आले होते.

कोविडमुळे आपण तीन महिने पाठपुरावा थांबविला होता. उद्धव ठाकरे यांनी जमिनीचे व्यवहार, बंगले याची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात लपविल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. सन २०१४ ते २०२० या कालावधीत ही मालमत्ता अन्वय नाईक यांच्याच नावे होती. पण या संपत्तीचे मालक हे उद्धव ठाकरे होते. प्रतिज्ञापत्रात माहिती लपवून उद्धव ठाकरे यांनी मतदारांना अंधारात ठेवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.

- Advertisement -

ठाकरे यांनी वास्तुविशारद अन्वय नाईक यांची रायगडमधील मालमत्ता 6 वर्षे बेनामी पद्धतीने स्वतःकडे ठेवली. तसेच या मालमत्तेचा व्यवहार विधानसभा निवडणूक २०१९ च्या प्रतिज्ञापत्रामध्ये दाखविला नाही. ११ नोव्हेंबर २०२० रोजी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा रवींद्र वायकर यांच्या रायगडमधील बेनामी मालमत्तेचा पर्दाफाश केल्यानंतर दुसर्‍याच दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबर २०२० रोजी दोघांनी मालमत्ता कर, वीज कर आणि पाणीपट्टी भरल्याचा दस्तावेज आपल्याकडे उपलब्ध असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. दरम्यान, याबाबत तहसीलदार गमन गावित यांनी सांगितले की, सोमय्या यांनी मागितलेली माहिती त्यांना देण्यात आली असून, उर्वरित माहिती लवकरच देण्यात येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -