घररायगडविजेअभावी जिते गावचे शेतकरी त्रस्त

विजेअभावी जिते गावचे शेतकरी त्रस्त

Subscribe

तालुक्यातील जिते गावातील शेतकर्‍यांसाठी लावण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी काढून नेण्यात आल्याने शेती पंपासाठी वीज पुरवठा होत नसून परिणामी शेतकर्‍यांच्या जमिनी पीक न घेता ओसाड पडून आहेत. नेरळ-कशेळे मार्गावर जिते गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत.

तालुक्यातील जिते गावातील शेतकर्‍यांसाठी लावण्यात आलेला ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीसाठी काढून नेण्यात आल्याने शेती पंपासाठी वीज पुरवठा होत नसून परिणामी शेतकर्‍यांच्या जमिनी पीक न घेता ओसाड पडून आहेत. नेरळ-कशेळे मार्गावर जिते गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी आहेत. त्या जमिनींच्या बाजूने उल्हास नदी वाहत असून, शेतकरी अनेक वर्षे उन्हाळ्यात भाजीपाला आणि फुलशेती करीत असतात. त्या शेतकर्‍यांच्या मागणीनंतर २०१८ मध्ये महावितरणने ट्रान्सफॉर्मरची सुविधा निर्माण करून दिली. त्यामुळे विजेचे पंप लावता आल्याने काही हेक्टर जमिनीमध्ये उन्हाळ्यात भाजीपाला आणि कडधान्य, तसेच फुलशेतीला बहर येऊ लागला.

याबाबत मागील आठवड्यात माहिती मिळाली असता आपण तत्काळ पनवेल येथील कार्यकारी अभियंता कार्यालयाशी बोलणे केले आहे. येत्या आठवड्यात ट्रान्सफॉर्मर बसवून वीज पुरवठा सुरू केला जाईल.
– गणेश देवके, उप अभियंता, महावितरण, कर्जत

- Advertisement -

जानेवारीमध्ये या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने पंप लावून शेतात नदीचे पाणी आणून शेती करणारे शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून संकटात सापडले आहेत. स्थानिक शेतकरी अरुण जाधव आणि शरद जाधव यांनी महावितरणच्या नेरळ येथील कार्यालयाला याची माहिती दिली. त्यानंतर ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीच्या कामासाठी काढून नेण्यात आला. मात्र दोन महिने झाले तरी ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आलेला नाही. परिणामी १५ हून अधिक शेतकर्‍यांच्या जमिनीत नदीचे पाणी आणता येत नाही. पाण्याअभावी तयार झालेले पीक सुकून गेल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा –

Assembly Election 2021: कडक सुरक्षेत बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान; ममता बॅनर्जी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -