घररायगडगेल कंपनीच्या आवारात आग; सावरोलीतील घटना, स्फोटाचे धमाके

गेल कंपनीच्या आवारात आग; सावरोलीतील घटना, स्फोटाचे धमाके

Subscribe

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेला खालापूर - पेण जोडरस्तावरील सावरोली गावाशेजारील इंडिया बुल्स प्रकल्पाच्या आणि गेल कंपनीच्या सबस्टेशन जवळील सुकलेल्या मोकळ्या रानमाळावर शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागला. वणवा इतका भयानक होता की आगीचा भडका वाढताच होता.तर उच्च दाबाच्या लाईन असल्याने अधून मधून स्फोट होत होते.गॅस वाहून नेणार्‍या गेल कंपनीच्या लाईन व मुख्य व सबस्टेशन असल्याने या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे ही आग अटोक्यात आणण्यासाठी परिसरातील कंपन्यांतील फायर ब्रिगेड च्या वाहनांना पाचारण करण्यात आले होते.

खोपोली: मुंबई – पुणे एक्सप्रेसवेला खालापूर – पेण जोडरस्तावरील सावरोली गावाशेजारील इंडिया बुल्स प्रकल्पाच्या आणि गेल कंपनीच्या सबस्टेशन जवळील सुकलेल्या मोकळ्या रानमाळावर शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अचानक वणवा लागला. वणवा इतका भयानक होता की आगीचा भडका वाढताच होता.तर उच्च दाबाच्या लाईन असल्याने अधून मधून स्फोट होत होते.गॅस वाहून नेणार्‍या गेल कंपनीच्या लाईन व मुख्य व सबस्टेशन असल्याने या ठिकाणी परिस्थिती चिंताजनक झाली होती. त्यामुळे ही आग अटोक्यात आणण्यासाठी परिसरातील कंपन्यांतील फायर ब्रिगेड च्या वाहनांना पाचारण करण्यात आले होते.भीषण आग विझवित असताना अग्निशमन दलाचे जवान,अपघातग्रस्त टिमचे सदस्यांना धुरांमुळे खोकला,दम कोंडत होता मात्र जिवाची पर्वा न करता तीन तासांच्या मेहनतीनंतर आग विझविण्यासाठी मोठे यश मिळाले आहे.
गेल कंपनीच्या सब स्टेशनच्या बाजूला मोकळे रान असल्याने मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून या सुकलेल्या गवताचा अज्ञातांच्या कृत्यामुळे आग लागली होती या आगीमुळे मोठ्याप्रमाणात भडका उडत असल्याने धुराचे लोट सर्वत्र पसरले होते ही आग विजविण्यासाठी खोपोली फायर ब्रिगेड, देवदूत यंत्रणा खालापूर टीम, उत्तम स्टीलचे फायर ब्रिगेड, टाटा स्टीलची फायर ब्रिगेड च्या वाहनांतून पाण्याच्या फवार्‍या मुळे आगीची तीव्रता कमी करण्यात यश मिळाले आणि अपघातग्रास्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेची टीम जवळजवळ तीन तास प्रयत्न करत होते या घटने गांभीर्य लक्षात घेत खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी सर्व यंत्रणांचे नियोजन करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे.
खालापूर तालुका पोलीस स्टेशनची सर्व टीम आणि खालापूर तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी, नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी मदत कार्यात सहभाग घेतला.त्यामुळे तीन तासांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -