घररायगडढेकु गावा जवळील पायरोटास्क एनर्जी कंपनीत भीषण आग

ढेकु गावा जवळील पायरोटास्क एनर्जी कंपनीत भीषण आग

Subscribe
  1. खोपोली-:खालापूर तालुक्यातील ताकई-आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ असलेल्या पायरोटास्क एनर्जी कंपनीत सायंकाळी 5.30 वाजता भीषण आग लागली.या आगीतकंपनीतील मशीनरी आणि कच्चा माल पूर्णतः जळून खाक झाला असुन. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.(Fire in khopoli)

खालापूर तालुक्यातील ताकई-आडोशी रस्त्यावरील ढेकू गावाजवळ संध्याकाळी 5.30 दरम्यान पायरोटास्क एनर्जी कंपनीमध्ये शॉटसर्किटमुळे आग लागल्याचे समजते. या आगीने थोड्या वेळात रौद्ररूप धारण केले. मशीनवरील कारागीराला समजल्यानंतर त्याने सर्व कामगार आणि स्टाफला बाहेर काढले. त्यानंतर अग्निशमन दलास आणि खोपोली पोलिस ठाण्यात संपर्क करून घडलेला प्रकार सांगताच खोपोली अग्निशमन दल, टाटा स्टील अग्निशमन दल, आलाना अग्निशमन दल, जे. एस. डब्लू पालिफाटा अग्निशमन दल तसेच खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी त्वरित घटनास्थळी पोहचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच अग्निशमन दलाच्या जवानांनी फोमचा वापर करीत आग विझविण्यास सुरुवात केली. दोन तासांच्या अथक प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात यश आले. या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाला नाही. मात्र, या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले हे मात्र खरे आहे. यावेळी महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी भरत सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -