Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर रायगड महाडमधील भीवघर मोहोतमध्ये गोळीबार; दोघेजण गंभीर जखमी

महाडमधील भीवघर मोहोतमध्ये गोळीबार; दोघेजण गंभीर जखमी

Subscribe

शुक्रवारी रात्री महाड तालुक्यातील मोहोत येथे शुल्लक कारणावरून एकाने फायरिंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या गोळीबारामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (२३,भीवघर) आणि संकेश शशिकांत कदम (२८, भीवघर) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले.

महाड: शुक्रवारी रात्री महाड तालुक्यातील मोहोत येथे शुल्लक कारणावरून एकाने फायरिंग केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या गोळीबारामध्ये सोहम आत्माराम हिरडेकर (२३,भीवघर) आणि संकेश शशिकांत कदम (२८, भीवघर) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे असून त्यांना येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठवण्यात आले.

महाड औद्योगिक पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींपैकी एकाच्या पायाला गंभीर जखम झाल्यामुळे त्याला अधिक उपचार करिता मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. यामध्ये रोशन राम मोरे (मोहोत पाटीलवाडी) असे फायरिंग करणार्‍या आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे तसेच आरोपीकडून पोलिसांनी बंदूकही हस्तगत केली आहे. तालुक्यातील मोहोत येथे मंदिराचा जिर्णोद्धार कार्यक्रम असताना मागील भांडणाचा राग मनात धरून हा गोळीबार झाल्याचे समजते. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास येथील एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे हे करीत आहेत.

- Advertisement -

 नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया

गावात मंदिर जिर्णोद्धराचा कार्यक्रम सुरु असतानाच असा प्रकार घडल्याने गावात खळबळ माजली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात अशा प्रकारची हत्यारे कोठून आली याचा तपास होणे महत्वाचे आहे. गेली कांही दिवसात महाड औद्योगिक क्षेत्रात कायदा सुरक्षा धोक्यात आली आहे. याबाबत औद्योगिक पोलिसांवर सामान्य नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -