घररायगडमच्छिमारांना ७ कोटींचा डिझेल परतावा मिळणार, मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या मच्छिमारांना दिलासा

मच्छिमारांना ७ कोटींचा डिझेल परतावा मिळणार, मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या मच्छिमारांना दिलासा

Subscribe

समुद्रात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून मासळीचे उत्पादन घटले असून मच्छिमारांची आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे. वर्ष २०१७ पासून कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा शासनाकडे रखडला आहे. यापैकी काही प्रमाणात परताव्याचा निधी फिशरीज खात्याकडे वर्ग करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना महाराष्ट्र शासनाच्या फिशरीज खात्याकडून लवकरच ७ कोटी रुपयांचा डिझेल परतावा वितरित करण्यात येणार असल्याची माहिती रायगड मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी दिली. मासळीच्या दुष्काळाने होरपळलेल्या मच्छिमार बांधवांसाठी हा एक आशेचा किरण ठरेल असे त्यांनी म्हटले.

समुद्रात गेल्या ३ ते ४ वर्षांपासून मासळीचे उत्पादन घटले असून मच्छिमारांची आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे. वर्ष २०१७ पासून कोट्यवधी रुपयांचा डिझेल परतावा शासनाकडे रखडला आहे. यापैकी काही प्रमाणात परताव्याचा निधी फिशरीज खात्याकडे वर्ग करण्यात येत आहे. समुद्रात २० वर्षांपूर्वी मासळीची दुष्काळी परिस्थिती नव्हती. समुद्रात वाढते प्रदूषण, बेकायदेशीर पध्दतीने केली जाणारी मासेमारी, बदलते वादळी हवामान यामुळे मासळी नामशेष होत गेली. याकडे कोणीही गंभीरपणे लक्ष दिले नाही. मासळीचे प्रमाण घटत गेल्यानंतर आता त्याचे परिणाम मोठया प्रमाणावर जाणवू लागले आहेत. समुद्रात वाढलेल्या अवास्तव प्रदूषणामुळे मोठया मच्छिमारांना देखील दुष्काळाची मोठी झळ बसल्याचे दिसून येत आहे. छोट्या पारंपरिक मच्छिमारांची आर्थिक बाजू अत्यंत कमकुवत झाली असून प्रपंच कसा चालवायचा कसा? असा रोजच प्रश्न पडत असल्याचे मुरुडचे मच्छिमार जगन्नाथ पाटील यांनी सांगितले. डिझेल परतावा आता तरी लवकर मिळावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

आज मच्छिमारी सहकारी संस्थेत मच्छिमारांना डिझेल प्रति लिटर १२२ रुपयांना मिळते. त्याउलट खाजगी पेट्रोलपंपावर प्रति लिटरचा भाव ९४ रुपये आहे. शासनाकडून चालू असलेला हा प्रकार अनाकलनीय असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. मच्छिमार बांधवांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा परिस्थिती ७ कोटी रुपयांचा परतावा मिळणार हा आशेचा किरण म्हणजे वाळवंटातील हिरवळ असेच म्हणता येईल.

एकेकाळी मुरूड मच्छी मार्केट मध्ये मासळीची सुबत्ता होती. रोज होड्या भरून मासळी मिळत होती. कोळी बांधव बँकांचे कर्ज सहजभरत असत. अनेकजण होडी मालकही झाले. काही वर्षात ही परिस्थिती पालटून मासळीचे प्रमाण घटत गेले. मुरूडमध्ये २० वर्षापूर्वी पापलेट, रावस, कोलंबी, जिताडा, घोळ, सुरमई अशी महत्त्वाची मासळी अतिशय स्वस्त आणि मुबलक मिळत होती. पापलेटची जोडी ५० ते ६० रुपयांपर्यंत उपलब्ध होती. तांब, बांगडे, पाल, पालु अशा प्रकारातील मासळीला कोणताही भाव मिळत नसे.जवळा म्हणजे अगदीच नगण्य मासळी होती. आज परिस्थिती पालटली आणि उत्पादन मोठया प्रमाणात घटल्याने मासळीला सोन्याचा भाव आला आहे. असे असूनही मासळी मिळत नाही ही शोकांतिका ठरत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -