घररायगडखासगी बसमधून साडेतीन किलो सोन्यासह ५ लाखाची रोकड लंपास

खासगी बसमधून साडेतीन किलो सोन्यासह ५ लाखाची रोकड लंपास

Subscribe

एक्सप्रेसवेवरील फुडमॉल येथील निशीसागर हॉटेलच्या पार्किंगमध्ये बस चहापानासाठी थांबली असता बसमधून प्रवासी उतरल्यावर चोरट्यांनी सीटवरील बॅग कटरच्या सहाय्याने कापून बॅगमधील साडेतीन किलो सोने आणि पाच लाखाची रोख रक्कम चोरल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

खोपोली: एक्सप्रेसवेवरील फुडमॉल येथील निशीसागर हॉटेलच्या पार्किंगमध्ये बस चहापानासाठी थांबली असता बसमधून प्रवासी उतरल्यावर चोरट्यांनी सीटवरील बॅग कटरच्या सहाय्याने कापून बॅगमधील साडेतीन किलो सोने आणि पाच लाखाची रोख रक्कम चोरल्याची घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.खोपोली पोलिसांनी सदर गंभीर घटनेची दखल घेत अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला यांनी घटनास्थळी भेट देवून तपास केला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी चोरांना पकडण्यासाठी स्वतंत्र पथक तातडीने तयार केले आहे.
मुंबईतील पवईतील ज्वेलर्स व्यावसायिक महेंद्र नागाराज मालू (३९) मुंबई हे हैद्राबाद ते मुंबई असा एका खासगी बस (एमपी०९/एफए ९३०३८)मधून प्रवास करीत असताना हॉटेलच्या पार्किंगमध्ये बस थांबली असता बसमधील प्रवाशी उतरल्यावर चोरट्यांनी सीटवरील बॅग कटरच्या सहाय्याने कापून तीमधील साडेतीन किलो सोने आणि पाच लाखाची रोख रक्कम असा एकून २ कोटी ८ लाख १५ हजाराचा ऐवज चोरला असल्याची माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.
खोपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय शुक्ला, खोपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राकेश कदम करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -