घररायगडखोटा असेसमेंट बनवून मालकाची फसवणूक

खोटा असेसमेंट बनवून मालकाची फसवणूक

Subscribe

पाबळ ग्रामसेवकाच्या निलंबनाची मागणी

तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायतीमधील एक अजब प्रकार उघडकीस आला असून, ग्रामसेवक आणि सरपंचाने ग्रामपंचायत हद्दीमधील जांबोशी गावातील किरण पांडुरंग काडगे यांच्या दुकानाचा असेसमेंट उतारा परस्पर दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर केला आहे. त्यामुळे फसवणूक झाल्याने ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काडगे यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे केली आहे.

काडगे यांच्या दुकान गाळ्याचा असेसमेंट क्रमांक 158 असून, ते वेळोवेळी करसुद्धा भरत आहेत. मात्र सरपंच राजेश्री जाधव आणि ग्रामसेवक टी. बी. धरणे यांनी ग्रामसभेत कोणताही ठराव न घेता, तसेच कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता हा असेसमेंट क्रमांक 167 असा बदलून सदर दुकान गाळा दामोदर हरिश्चंद्र शिगवण यांच्या नावे केला आहे. ही नोंद खोटी असल्याची तक्रार करण्यात आली आहे. याबाबत तक्रारदार कागडे आणि शिवसेनेचे विभाग प्रमुख नरेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

- Advertisement -

26 मार्च 2021 रोजीच्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभेतील हा चर्चेचा विषय नसूनही या ठराव क्रमांकाची नोंद इतिवृत्तध्ये कशी आली, दामोदर शिगवण यांना 177 क्रमांकाचा खोटा असेसमेंट उतारा देऊन नमुना क्रमांक 8 नियम 32 (1) कसा टाकला, असा सवाल तक्रारदाराने उपस्थित केला आहे. या संदर्भात ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार, आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.

ग्रामसेवक टी. बी. धरणे यांनी त्यांच्याकडून नजरचुकीने नोंद झाली असल्याचे त्यांनी मान्य केले असून, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
श्री. गडरी, प्रभारी गट विकास अधिकारी, पेण पंचायत समिती

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -