घररायगडपनवेलच्या ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण तर ३२ संशयित; लसीकरण पथके कार्यरत

पनवेलच्या ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण तर ३२ संशयित; लसीकरण पथके कार्यरत

Subscribe

तालुक्यातील ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण सापडून आले आहेत. तर संशयित ३२ रुग्ण सापडून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.गोवरची संख्या दिवसेंदिवस परिसरात वाढू लागलेली आहे. पनवेल तालुक्यातील वडघर येथे एक, उलवे येथे एक आणि बारापाडा येथे दोन असे ४ गोवरचे रुग्ण सापडून आले आहेत.

पनवेल: तालुक्यातील ग्रामीण भागात गोवरचे चार रुग्ण सापडून आले आहेत. तर संशयित ३२ रुग्ण सापडून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.गोवरची संख्या दिवसेंदिवस परिसरात वाढू लागलेली आहे. पनवेल तालुक्यातील वडघर येथे एक, उलवे येथे एक आणि बारापाडा येथे दोन असे ४ गोवरचे रुग्ण सापडून आले आहेत. तर ३२ संशयित रुग्ण सापडून आले आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून गोवर रुबेला लसीकरणासाठी १५ ते २५ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेत आरोग्य विभागाकडून २६ जानेवारी २०२३ पर्यंत सर्व लाभार्थी मुलांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले असून लसीकरण करण्यासाठी जिल्ह्यामध्ये पथके कार्यरत करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ७४ विशेष लसीकरण सत्र

- Advertisement -

या मोहिमेत डोस देण्याचे राहिलेल्या मुलांना घरोघरी सर्वेक्षण करून नजिकच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये शिल्लक राहिलेला पहिला किंवा दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून पूर्व तयारी करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात ७४ विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. तर नियमित १ हजार ७६० लसीकरण सत्रामध्ये गोवर लसीकरण केले जाईल.

आरोग्य विभागाला सहकार्य करावे

- Advertisement -

९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांचे गोवर रुबेला लसीकरण झाले नसल्यास तत्काळ नजिकच्या आंगणवाडी केंद्र, आरोग्य केंद्राकडे संपर्क करुन लसीकरणासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे व जिल्हा माताबालसंगोपन अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -