घररायगडतरुणांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा वसा, ओसाड डोंगरावर हिरवळ बहरवण्याचा फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुपचा...

तरुणांनी घेतला वृक्षसंवर्धनाचा वसा, ओसाड डोंगरावर हिरवळ बहरवण्याचा फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुपचा संकल्प

Subscribe

फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना २०८ वृक्षांचे रोपण जुन २०२१ मध्ये केले. यामध्ये फुलझाडे कांचन, बकुळी, गुलमोहर तर फळझाडे बदाम, जांभूळ, पेरू, लिंबू यांच्यासह तुळस, पिंपळ, वड, कडुलिंब, बांबू या झाडांचा समावेश आहे.

दोन वर्षांपासून जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासत असताना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो. अनेकांना ऑक्सिजनअभावी प्राणाला मुकावे लागले. त्यामुळे ऑक्सिजनचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढावे, यासाठी पनवेल तालुक्यातील मोहो-शिवकर-चिखले डोंगरावर असणार्‍या श्री शिव भोलेनाथ मंदिर परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धनाचा ध्यास ॠफ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुपने घेतला आहे.

सध्याची तरुणाई व्यसनाधिनतेकडे मोठ्या प्रमाणात वळल्याचे पहावयास मिळते. मात्र, याला अपवाद ठरत फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुप पनवेलने कोणत्याही शासकीय निधी आणि मदतीविना २०८ वृक्षांचे रोपण जुन २०२१ मध्ये केले. यामध्ये फुलझाडे कांचन, बकुळी, गुलमोहर तर फळझाडे बदाम, जांभूळ, पेरू, लिंबू यांच्यासह तुळस, पिंपळ, वड, कडुलिंब, बांबू या झाडांचा समावेश आहे.

- Advertisement -

फ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुपचे सदस्य हर्षल पाटील, जयेश पाटील, विशाल पाठे, प्रदीप बराते, गिरीश पाटील, जयेश म्हात्रे, नयन पाटील, तन्वेश टोपले, निखिल टोपले, प्रणय म्हात्रे, अझहर शेख आदींनी स्व:खर्चाने वृक्ष संवर्धन करून जिल्ह्यातील इतर तरुणांसमोर नविन आदर्श ठेवला आहे.

जमिनीपासून जवळपास १०० ते १५० फूट उंच असणार्‍या डोंगरावर पाणी पुरवठा करण्याचे मोठे आव्हान तरुणांसमोर आहे. सध्या सोलर पॅनलच्या सहाय्याने वीज पुरवठा होत असून त्या विजेवरच दोन छोट्या मोटारने पाणी पुरवठा होत आहे. मात्र काही दिवसात उन्हाची झळ बसण्यास सुरुवात होणार असल्याने पाणी टंचाईची समस्या उद्भवणार आहे.

- Advertisement -

पनवेल तालुक्याचे तरुण आणि कार्यक्षम तहसीलदार विजय तळेकर यांना ॠफ्रेंड्स ऑफ नेचर ग्रुपच्या वृक्ष संवर्धन उपक्रमाबाबत समजताच, त्यांनी कौतूक करीत ग्रुप सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच, फ्रेंड्स ऑफ नेचरच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी लवकरच भेट देणार असल्याचे आश्वासन दिले.

लॉकडाउन काळात संपूर्ण देश घरात असताना मोहो, शिवकर, चिखले परिसरातील रहिवाशी संध्याकाळच्या वेळेस डोंगरावर मोकळा श्वास घेण्यास येत होते. त्यावेळी मंदिर परिसरातील २-४ झाडे वगळता संपूर्ण डोंगर ओसाड होते, याची मनाला खंत वाटत होती. म्हणून ओसाड डोंगरावर हिरवाई बहरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ग्रामपंचायत शिवकरचे आम्हाला सहाय्य मिळाले.
-हर्षल पाटील, अध्यक्ष, फ्रेंड्स ऑफ नेचर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -