घररायगडनैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत गणपती कारखानदारांचा समावेश करावा : मूर्तीकारांची मागणी

नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाईत गणपती कारखानदारांचा समावेश करावा : मूर्तीकारांची मागणी

Subscribe

स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्यानंतर मोठ्या कालावधी नंतरही कोणतीही भरपाई मिळाली नाही.

कोकणात निसर्ग,तोक्ते सारखी चक्रीवादळे आणि पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले. गणपती मूर्तीकारांना शासनाकडून भरपाई न मिळणे दुर्दैवी असून कोकणातील बहुसंख्य मूर्तीकारांची आर्थिकस्थिती हलाखीची असल्याने त्यांनाही भरपाई मिळावी, अशी मागणी मजगावचे प्रसिद्ध गणपती मूर्तीकार चंद्रकांत बुल्लू यांनी केली आहे.गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाने बुल्लु यांच्या कारखान्याच्या इमारतीवरील पत्रे उडून मूर्त्यां खंडीत झाल्या होत्या. शिवाय अन्य किंमती साहित्याची नासधूस होऊन ७-८ लाखाचे नुकसान झाले होते. स्थानिक महसूल अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्यानंतर मोठ्या कालावधी नंतरही कोणतीही भरपाई मिळाली नाही. म्हणून चौकशी केल्यानंतर नैसर्गिक आपत्तीत कारखानदारांसाठी भरपाईचा समावेश नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने त्यांना धक्काच बसला.

कोकणात रोजगाराची फारशी संधी नसताना जे मूर्तिकार पिढ्यान् पिढ्या आपली ही कला तीन-चार महिन्यांसाठी जोपासत रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी करायचे काय?, असा सवालही त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कारखान्यात या काळात हातावर पोट असणारे दहा-बारा कामगार काम करतात, त्यांच्या रोजगाराचे काय?, असेही म्हटले आहे. बुल्लु हे दरवर्षी आठ इंचापासून चारफुटापर्यंत उंचीच्या चारशे मूर्त्या तयार करतात. त्यातील तिनशेहून अधिक शाडूच्या मातीपासून ते बनवतात. शाडूच्या मातीच्या एका गोणीला २०० रुपयाहून अधिक किंमत मोजावी लागते. रंग साहित्याचे भाव दरवर्षी वाढतच असतात. मजुरीही वाढतीच असल्याने खरेतर मूर्तीवर २० ते २५ टक्के वाढ अपेक्षित असते. परंतु बुल्लु यांनी यावर्षी केवळ पाच ते सात टक्क्यांनी किंमती वाढवल्या आहेत.

- Advertisement -

गणेशोत्सव नेमका पावसाळी हंगामात येत असल्याने पावसाचा त्रास सर्वच मूर्तिकारांना सहन करावा लागतो. त्यामुळे मूर्त्या ठेवण्यासाठी तीन-चार घरे भाड्यानी घ्यावी लागतात. उसरोली येथील कारखान्यासह राहत्या घराचाही त्यासाठी वापर ते करतात. रंगकाम सुरू झाल्यावर अशा वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याने वारंवार आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. जनरेटरचा वापर खर्चिक आहे. चक्रीवादळात त्यांचा जनरेटर निकामी झाला आहे. त्यामुळे त्यांची सारी भीस्त सध्या विजेवरच सुरु आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे वाहतूक वेळेवर होत नाही. तसेच या काळात झालेल्या भाववाढीमुळे लागणाऱ्या वस्तूचीही भाववाढ झाली आहे. त्यामुळे मूर्त्याचेही भाव अपोआप वाढले आहेत.


हेही वाचा – Tokyo Olympics : रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूला मिळणार सुवर्ण? चिनी खेळाडू अडचणीत येण्याची शक्यता

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -