घररायगडस्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याची सरकारची भूमिका -आमदार महेंद्र थोरवे 

स्थानिक बेरोजगारांना नोकरी देण्याची सरकारची भूमिका -आमदार महेंद्र थोरवे 

Subscribe

अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांबरोबर रोजगार ही महत्वाची गरज असल्यामूळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून राज्यभर महारोजगार शिबीर आयोजित केले जात आहेत. असे प्रतपादन करतानाच खालापूर तालुक्यात आयोजित शिबीरातून दीड हजार नोकरीची संधी तरूणांसाठी निर्माण केल्याची माहिती कआमदार महेंद्र थोरवे यांनी येथे दिली. या महारोजगार मेळाव्याला तरूण तरूणांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार थोरवे यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्जाचे वाटपही यावेळी करण्यात आले.खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार असल्याचे सांगितले.

 

खोपोली: अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या मूलभूत गरजांबरोबर रोजगार ही महत्वाची गरज असल्यामूळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द असून राज्यभर महारोजगार शिबीर आयोजित केले जात आहेत. असे प्रतपादन करतानाच खालापूर तालुक्यात आयोजित शिबीरातून दीड हजार नोकरीची संधी तरूणांसाठी निर्माण केल्याची माहिती कआमदार महेंद्र थोरवे यांनी येथे दिली. या महारोजगार मेळाव्याला तरूण तरूणांनी उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार थोरवे यांनी या मेळाव्याचे उद्घाटन केले.शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कर्जाचे वाटपही यावेळी करण्यात आले.खासदार श्रीरंग बारणे यांनी यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्रमुख अमिता पवार, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख संदेश पाटील, विधानसभा संघटक शिवराम बदे, समन्वयक बाबू पोटे, प्रवक्ते अमोल पाटील, शहर प्रमुख संदीप पाटील,भाजपचे शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर, मा.नगरसेवक राजू गायकवाड, हरेश काळे, शशिकांत देशमुख, संतोष विचारे, युवा सेनेचे तालुका प्रमुख रोहित विचारे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, नगरसेवक संकेत भासे,सुरेखा खेडकर, सुप्रिया साळुंखे,उपशहर प्रमुख दिनेश थोरवे,संतोष मुंढे,माजी नगरसेविका मेधा वाडकर,प्रिया जाधव कंपन्यांचे व्यवस्थापक यांच्याअन्य मान्यवर उपस्थित होते. मेळाव्याचे सूत्रसंचालन अभिषेक सुर्वे यांनी केले.

- Advertisement -

१५०० नोकर्‍यांची संधी
जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आमदार महेंद्र थोरवे फाऊंडेशन आयोजित शासन आपल्या दारी महत्वकांक्षी उपक्रमाअंतर्गत खोपोलीतील समर्थ मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ामदार थोरवे बोलत होते. तालुक्यातील टाटा स्टिल,कमानी आँईल यासारख्या ५० कारखान्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या महारोजगार मेळाव्यात सहभाग घेतला होता.१५०० नोकर्‍यांची संधी या मेळाव्यातून स्थानिक तरुणांना उपलब्ध करून देण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -