मुरुडमध्ये नववर्षानिमित्त भव्य मिरवणूक

गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने शहरातील नागरिकांनी मोठी मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शहरातील सर्व नागरिक एकत्र येऊन अगोदरच मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आले, त्याप्रमाणे घराघरात भेटी देऊन या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे मोठ्या संख्येने लोक या मिरवणुकीत सामील झाले होते.

मुरुड: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्ताने शहरातील नागरिकांनी मोठी मिरवणूक काढून सर्वांचे लक्ष वेधून घेतले तसेच विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.शहरातील सर्व नागरिक एकत्र येऊन अगोदरच मिरवणूक काढण्याचे ठरवण्यात आले, त्याप्रमाणे घराघरात भेटी देऊन या मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे मोठ्या संख्येने लोक या मिरवणुकीत सामील झाले होते.
मिरवणुकीत सहभागी झालेल्या स्थानिक जनतेने डोक्यावर भगवा फेटा परिधान केला होता तर हातामध्ये भगवे झेंडे सर्वत्र फडकत होते.महिलांनी सुद्धा या मिरवणुकीत मोठ्या उत्सहाने सहभाग घेतला होता.सदरची मिरवणूक कोटेश्वरी मंदिर येथून सुरुवात करण्यात आली. शेगवाडा,गणेश पाखाडी,भोगेश्वर पाखाडी, सबनीस आळी,मसाल गल्ली, कुंभार वाडा,जुनी पेठ,बाजारपेठ आदी परिसरात फिरून सर्व नागरिकांना यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.मुरुड नगरपरिषद कार्यालयाजवळ मिरवणूक येताच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जेष्ठ शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भायदे यांच्या हस्ते शिवपुतळ्यास पुष्पमाला अर्पण करण्यात आली.
यावेळी बाईक रॅली सुद्धा काढण्यात आली.सदरील मिरवणुकीसाठी शहरातील ताराराणी ढोल ताशा पथकाचे बहुमूल्य सहकार्य लाभले.कोणतेही शुल्क न घेता सर्व महिला उत्साहाने सहभागी होऊन नववर्षांची मिरवणूक यशस्वी करण्यासाठी मोठे सहकार्य केले.
मिरवणुकीत रुपेश जामकर,कुणाल सतविडकर,आदेश दांडेकर,यश माळी,मनीष माळी,प्रशांत कासेकर,प्रकाश चव्हाण,विजय वाणी,युवराज भगत, मृणाल खोत,जागन पुलेकर,हसमुख जैन,कीर्ती शहा,राहुल कासार,शिवानी नाझरे,नेहा पटेल,शुभांगी कासार,प्रमिला माळी,वैशाली भावसार,मिताली घराणे,संदेश केने,अच्युत चव्हाण,महेंद्र मोहिते तसेच स्वराज्य सौदामिनी ताराराणी ढोल ताशा पथकातील सर्व महिला उपस्थित होत्या.