कर्जत: मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण असलेल्या गुढीपाडवा निमित्त कर्जतमधील अनेक संस्था एकत्र येऊन शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
कपालेश्वर देवस्थान समिती, सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विश्वहिंदू परिषद, बजरंग दल, प्रजापती ब्रह्माकुमारी, शिवतांडव प्रतिष्ठान ढोल ताशा पथक आदींनी एकत्र येऊन स्वागत यात्रेचे आयोजन केले होते. टिळक चौकातून या स्वागतयात्रेचा शुभारंभ करण्यात आला.या शोभायात्रेत साईनाथ श्रीखंडे, विनायक उपाध्ये, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, नगरसेवक बळवंत घुमरे,स्वामीनी मांजरे, अभिजित मराठे, सुनील गोगटे, राहुल वैद्य, दिलीप गडकरी, ठमाताई पवार, बिनीता घुमरे, सदानंद जोशी, किरण ठाकरे, विशाल जोशी, अनुराधा गोखले, कुलाबा जिल्हा धर्मप्रसार प्रमुख दिनेश रणदिवे, अनंत हजारे. दिनेश पद्माकर गांगल, सरस्वती चौधरी, उमेश जोशी, निलेश परदेशी, मल्हारी गुरव, गौरव भानुसघरे, रुपेश पाटील, अनंत हजारे आदीं सह नगरसेवक, नगरसेविका, कर्जतकर मोठ्या संखेने उपस्थित होते. मिरवणुकीत चिमुकल्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, श्री राम, सीता, लक्ष्मण, मावळे आदींची वेशभूषा करून कर्जतकरांची मने जिंकली. साहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे, प्रशांत देशमुख यांनी पोलीस कर्मचार्यांसह चोख बंदोबस्त ठेवला होता.
कर्जतमध्ये गुढीपाडवा उत्साहात साजरा
मराठी नववर्षाच्या स्वागताचा सण असलेल्या गुढीपाडवा निमित्त कर्जतमधील अनेक संस्था एकत्र येऊन शहरात मराठी नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांश गावात गुढ्या उभारून गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -