घररायगडहाळफाटा - पळसदरी रस्ता धोकादायक; ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अपघाताची शक्यता

हाळफाटा – पळसदरी रस्ता धोकादायक; ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे अपघाताची शक्यता

Subscribe

राज्य रस्ते विकास महामंडळ आणि खासगी ठेकेदार कंपनीकडून हाळफाटा मार्गे पळसदरी कर्जत अशा मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण गेल्या काही वर्षापासून वर्षे सुरूच आहे. चार वर्षानंतरही अनेक टप्प्याचे काम अद्याप ही नुतनीकरणाचे काम शिल्लक असल्याने याचा नाहक त्रास वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून धोकादायक काही ठिकाणी कोणतेही सावधनतेचे फलक अथवा पोस्टर लावण्यात न आल्याने अनेक वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सारिका सावंत / खोपोली
राज्य रस्ते विकास महामंडळ आणि खासगी ठेकेदार कंपनीकडून हाळफाटा मार्गे पळसदरी कर्जत अशा मार्गाचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण गेल्या काही वर्षापासून वर्षे सुरूच आहे. चार वर्षानंतरही अनेक टप्प्याचे काम अद्याप ही नुतनीकरणाचे काम शिल्लक असल्याने याचा नाहक त्रास वाहन चालक आणि प्रवाशांना सहन करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडून धोकादायक काही ठिकाणी कोणतेही सावधनतेचे फलक अथवा पोस्टर लावण्यात न आल्याने अनेक वाहनांना अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मंगळवारी रात्री १० वाजून ३० मिनिटाच्या सुमारास कर्जतहून खोपोलीकडे येणार्‍या एका दुचाकी वाहन चालकांला नावंढेवाडी जवळ खड्डा समजून न आल्याने झालेल्या अपघातात वाहन चालकाला मोठी दुखापत झाली. उपचारासाठी त्याला तात्काळ खोपोली नगरपालिका रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यावेळी ठेकेदारांच्या निष्काळजीपणाबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ठेकेदाराने आता तरी तातडीने या मार्गावर योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात अन्यथा काहींचा नाहक जीव जायचा… अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत अहे. त्याचबरोबर संबंधित प्रशासनानेनही निष्काळजीपणा घेणार्‍या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

१८ महिन्यांच्या मुदतीचे काम चाललेय ४ वर्षे
खालापूर तालुक्याला कर्जत तालुक्याशी जोडणारा एक मुख्य मार्ग म्हणून हाळफाटा मार्गे केळवली, पळसदरी रस्त्याची ओळख आहे. मागील ४ वर्षांपासून या रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रीटीकरण सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळच्या माध्यमातून कोटयावधीचा निधी यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, सदर नुतनीकरणाचे काम टीएनटी इन्फ्राट्रक्चर या ठेकेदाराने घेतले असून १३ किमी अंतराच्या या मार्गांचे काम १८ महिन्यांत पूर्ण करायचे होते. मात्र, मागील ४ वर्षाहून अधिक काळापासून हे काम रेंगाळत सुरू आहे. वर्तमान स्थितीत काही ठिकाणी खड्डे, रस्त्यावर मोठाले मातीचे ढिगारे तर मध्येच डांबरी रस्ता, सुरक्षाबाबत पूर्णपणे दुर्लक्ष यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत कित्येकांना जायबंदी होण्याची वेळ येत आहे.

- Advertisement -

यापूर्वी गेला दोघांचा जीव
ठेकेदारांचा निष्काळजीपणा अनेकांना धोक्याची घंटा देत असताना या आधी दोघांना आपला जीव जागीच गमवावा लागला होता. त्यामुळे अनेक जण ठेकेदारांच्या मनमानी कारभाराबाबत नाराजी व्यक्त करीत असून ठेकेदाराने वेळीच उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करीत असताना ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष केल्याने त्यानंतर आतापर्यत अनेक लहान – मोठे अपघात होत अनेकांना गंभीर दुखापती झाल्या असता मंगळवारी रोजी पुन्हा नावंढे वाडी येथे अपघात होऊन एका दुचाकी वाहन चालकाला दुखापत झाल्याने ठेकेदाराच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -