Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर रायगड मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘हेल्मेट सक्ती’ हवीे - पोलीस अधीक्षक चिखले

मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘हेल्मेट सक्ती’ हवीे – पोलीस अधीक्षक चिखले

Subscribe

हेल्मेट न वापरल्याने रस्त्यावरील अपघातात ७२ टक्के लोकांना जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे हेल्मेट वापरणे सक्तीचे असावे, सन २०२१ साली हेल्मेट न वापरल्याने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘हेल्मेट सक्ती’ हवी, असे मत व्यक्त करतानाच मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांचे आभार मानले पाहिजेत,असे प्रतिपादन महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी येथे केले.

चौक: हेल्मेट न वापरल्याने रस्त्यावरील अपघातात ७२ टक्के लोकांना जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे हेल्मेट वापरणे सक्तीचे असावे, सन २०२१ साली हेल्मेट न वापरल्याने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील ४६ हजार लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे रस्ते अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी ‘हेल्मेट सक्ती’ हवी, असे मत व्यक्त करतानाच मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांचे आभार मानले पाहिजेत,असे प्रतिपादन महामार्ग वाहतूक शाखेचे पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी येथे केले.
राज्याचे वाहतूक शाखेचे अपर पोलीस महासंचालक डॉ.रविंद्र कुमार यांच्या संकल्पनेतून पोलीस केन्द्र पळस्पे आणि जिल्हा परिक्षेत्रच्यावतीने रस्ता सुरक्षा आणि हेल्मेट जनजागृती अभियान २०२३ अंतर्गत ठोंबरे यांच्या विद्यमाने मोफत हेल्मेट वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी पोलीस अधीक्षक चिखले बोलत होते. हेल्मेट वापरणे आवश्यक का आहे याची सविस्तर माहिती अपघातग्रस्त सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल यांनी केले. कार्यक्रमास चौकच्या सरपंच रितु ठोंबरे, पोलीस उप अधीक्षक महामार्ग संदीप भागडीकर, पोलीस निरीक्षक गौरी मोरे, अपघातग्रस्त टीम चे विजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वीस सूचनांचा विचार करा
यावेळी वाहतूक चिन्ह, सूचना, अवजड वाहन तिसर्‍या लेनमधून चालविणे, वेग मर्यादा पालन, वाहन चालक यांनी वाहन चालवताना मोबाईल न वापरणे, नशा करुन न चालविणे, सीट बेल्ट बांधलेला असावा, रस्ता ओलांडताना पादचारी यांनी फुटपाथ अथवा भुयारी मार्गाचा वापर करणे अशा वीस सूचनांचा विचार करावा असे आवाहन पोलिसांनी केले.

- Advertisement -

महामार्गावरून मोठे ट्रेलर, हायवा,डंपर या गाडीत चालकांसोबत िेक्लनर नसतो त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे,कर्जत,पनवेल,खोपोली दिशेकडे चौक – कर्जत फाट्यावर वळताना मोठ्या गाड्यांना त्रास होतो, वळण न मिळाल्याने अपघात होत आहेत,त्यामुळे वळण रुंदीकरण, सिग्नल यंत्रणा उभी करावी
– सुधीर ठोंबरे,
जिल्हा उपाध्यक्ष, भाजप

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -